Dharashiv Crime News: बळजबरीनं विहीर कामासाठी आणलं अन् गुलाम बनवून ठेवलं; ११ मजुरांची पोलिसांकडून सुटका

Dharashiv Latest News In Marathi: पळून जाऊ नये म्हणून त्यांना चक्क साखळदंडाने बांधल्याचा प्रकार देखील समोर आला आहे.
Dharashiv Crime News
Dharashiv Crime Newssaam tv
Published On: 

>> बालाजी सुरवसे, साम टीव्ही

Dharashiv News: बळजबरीने विहीर कामासाठी आणून गुलाम बनवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिवमध्ये घडला आहे. एवढं नाही तर या मजुरांना मारहाण करून त्यांच्याकडून जबरदस्ती कामं करून घेतली जात होती. तसंच पळून जाऊ नये म्हणून त्यांना चक्क साखळदंडाने बांधल्याचा प्रकार देखील समोर आला आहे.

अशा ११ मजुरांची ढोकी पोलीसांनी सुटका केली आहे. या प्रकरणी गुत्तेदार कृष्णा बाळू शिंदे, संतोष शिवाजी जाधव आणि इतर दोन जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Dharashiv Crime News
Ayodhya Poul News: अयोध्या पौळ शाईफेक आणि मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल, दोन महिलांना अटक

याबाबत सविस्तर माहिती अशी की, धाराशिव तालुक्यातील वाखरवाडी येथे ६ तर कळंब तालुक्यातील खामसवाडी येथुन ५ मजुरांना विहीर कामासाठी आणून डांबून ठेवण्यात आलं होतं. यातील काही मजूर हे मध्यप्रदेशमधील आहेत, तर काही राज्यातीलच छञपती संभाजीनगर, हिंगोली, जालना, वाशिम, नांदेड आणि बुलढाणा येथील आहेत. (Breaking News)

या मजुरांना आरोपींनी विहीर कामासाठी परजिल्ह्यातून बोलवले होते. येथे बोलवल्यानंतर त्यांच्याकडून त्यांच्याकडून बळजबरीने विहीरीचे काम करून घेण्यात येत होते. हे काम करण्यासाठी त्यांना चक्क गुलाम बनवून ठेवले होते. गुलामांप्रमाणेच त्यांना मारहान देखील केली जात होता. (Crime News)

Dharashiv Crime News
Pune Crime News: वारजे माळवाडी परिसरात भरदिवसा तरुणावर गोळीबार; पुण्यात खळबळ

तसेच ते पळून जाऊ नये म्हणून त्यांना चक्क साखळदंडाने ट्रॅक्टरला बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशा ११ मजुरांची ढोकी पोलीसाच्या पथकाने सुटका केली आहे. तसेच यांच्याप्रमाणे आणखी काही मजूर डांबून ठेवण्यात आले आहेत का? याचा शोध आता पोलीस घेत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com