Ayodhya Poul News: अयोध्या पौळ शाईफेक आणि मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल, दोन महिलांना अटक

Ayodhya Poul Ink Throwing And Beating Case: या प्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आली असून कळवा पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक शिरसाट पुढील तपास करीत आहेत.
Ayodhya Poul News
Ayodhya Poul NewsSaam Tv
Published On

Thane News Today: महापुरुषांच्या प्रतिमेला हार घालण्याच्या वादातून शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कळवा ही घटना घडली.

फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत अयोध्या पौळ यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी शाईफेकनंतरचे काही फोटोही पोस्ट केले आहेत. या प्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आली असून कळवा पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक शिरसाट पुढील तपास करीत आहेत.

Ayodhya Poul News
Maharashtra Cabinet Expansion: उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना, शाहांची घेणार भेट; मंत्रिमंडळ विस्तारावर होणार चर्चा?

नेमकं काय आहे प्रकरण?

अयोध्या पौळ यांनी सांगितले की, कळवा येथे ठाकरे गटाच्या कार्यक्रमाचा बनाव करून मला बोलावण्यात आलं, इथे आल्यावर हा कार्यक्रम आपल्या गटाचा नसल्याची शंका मला आली. मी इथे आले तेव्हा मला इथे वेगळेच बॅनर दिसले. परंतु कार्यक्रमातून निघणं योग्य नसल्याने मी तिथे थांबले. (Breaking News)

या कार्यक्रमात मला महापुरुषांच्या प्रतिमांना हार घालण्यास सांगण्यात आले. मी महापुरुषांना हार घातले आणि त्यावेळी एक महिला तिथे आली आणि मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा आरोप केला. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात माझ्या अंगावर शाईफेक करण्यात आली असं अयोध्या पौळ यांनी सांगितले. (Latest Political News)

Ayodhya Poul News
Most Powerful PM: नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते; लोकसभा निवडणुकांबाबत मोठी भविष्यवाणी, रिपोर्टमध्ये दडलंय काय?

पोलिसांकडून दोन महिलांना अटक

या प्रकरणात आयोध्या पोळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या चेहऱ्याला शाही लावणाऱ्या महिला तसेच त्यांना धक्काबुक्की करणाऱ्या महिलांविरुद्ध कळवा पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रजिस्टर क्रमांक 300/2023, भादवी कलम 143, 145, 147, 149, 341, 323, 324 आणि 120 ब अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकणी दोन महिलांना अटक करण्यात आली असून कळवा पोलीस पुढील तपास करीत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com