तनपुरेंना थेट केरळमधून मुख्यमंत्री फडणवीसांचा फोन, पुढच्या क्षणाला निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?

Rahuri By Election Latest Political Developments Maharashtra: केरळ दौऱ्यावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी प्राजक्त तनपुरेंना केलेल्या एका फोननंतर राहुरी पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला.
Prajakta Tanpure withdraws from Rahuri bypoll after a crucial phone call from Devendra Fadnavis during his Kerala visit.
Prajakta Tanpure withdraws from Rahuri bypoll after a crucial phone call from Devendra Fadnavis during his Kerala visit.Saam Tv
Published On

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा निवडणुकीत मोठ्या राजकीय नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून राहुरी विधानसभा निवडणुकीत दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे पुत्र अक्षय कर्डीले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मविआ सरकारच्यावेळी ते राज्यमंत्री देखील होते.

Prajakta Tanpure withdraws from Rahuri bypoll after a crucial phone call from Devendra Fadnavis during his Kerala visit.
Prajakta Tanpure : तनपुरेंनी उमेदवारी अर्ज का भरला नाही? फडणवीसांचे नाव घेत सांगितलं कारण...

त्यामुळे भाजपचा पाठिंबा असूनही अक्षय कर्डीले यांना राहुरीची पोटनिवडणूक जड जाण्याची शक्यता होती. त्यामुळे भाजपने सोमवारी सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन दिग्गज नेते प्राजक्त तनपुरे यांच्या भेटीला पोहोचले. या तिघांमध्ये बराचवेळ बंद दाराआड चर्चा झाली. यानंतर तनपुरे यांनी माघार घेतल्याने अनेकांना मोठा धक्काच बसला.

Prajakta Tanpure withdraws from Rahuri bypoll after a crucial phone call from Devendra Fadnavis during his Kerala visit.
२००० कोटींची बेहिशेबी मालमत्ता, पुण्यातील बड्या अधिकाऱ्याला हायकोर्टाचा दणका; खुली चौकशी होणार, प्रशासनात खळबळ

रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन जरी त्यांचे मन वळवले असले तरी या सगळ्या राजकीय घडामोडींमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचे सांगितले जात आहे. देवेंद्र फडणवीस सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केरळ दौऱ्यावर आहेत. मात्र, आज रवींद्र चव्हाण हे तनपुरे यांच्या भेटीला पोहोचले तेव्हा त्यांनी तिथून थेट देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला.

Prajakta Tanpure withdraws from Rahuri bypoll after a crucial phone call from Devendra Fadnavis during his Kerala visit.
Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीवर शोककळा

या एका फोनने तनपुरे यांनी माघार घेतल्याचे सांगितले जात आहे. आगामी काळात प्राजक्त तनपुरे राहुरी मतदारसंघात सांगतील त्या विकासकामांसाठी आणि प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार 100 टक्के मदत करेल असे आश्वासन फडणवीसांनी तनपुरे यांना दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com