संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागलेत. अर्थमंत्र्यांपासून ते संरक्षणमंत्र्यांपर्यंत मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चा राष्ट्रीय पातळीवर रंगल्यात. मात्र या सगळ्यात सर्वात जास्त चर्चा रंगलीये ती महाराष्ट्रातून दिल्लीत जाणाऱ्या नावांची...मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आता केंद्रात जाणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. मात्र त्याहून मोठा दावा त्यांनी बावनकुळेंबाबत केलाय. आणि तो म्हणजे राज्यात शिंदेंची नव्हे तर मुख्यमंत्रिपदी बावनकुळेंची वर्णी लागणार असल्याचं राऊतांचं म्हणणंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटलंय.
राऊतांच्या या विधानानंतर महायुतीत अस्वस्थता निर्माण झालीय.. राज्यात अस्थिरता निर्माण करण्यासाठीच असे दावे केले जात असल्याची टीका भाजप नेते मुनगंटीवारांनी केलीय. तर बच्चू कडूंनी शिंदेंना संधी देण्याची मागणी करत आपलं घोडं दामटवलंय. तर मुख्यमंत्र्यांनी मात्र दिल्लीला जाण्याच्या प्रश्नावर मिश्कील टीप्पणी केलीय.
एकीकडे दिल्लीतील मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आणि दुसरीकडे राज्याच्या राजकारणातल्या संभाव्य बदलांवरून संजय राऊतांनी टाकलेल्या गुगलीमुळे महाय़ुतीत अस्वस्थता आहे...त्यामुळे येत्या काळात देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात कोणती मोठी उलथापालथ होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.