जंतर मंतरवर राजकीय नेत्यांची धरपकड; 4 माजी मुख्यमंत्री दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

Mamata Banerjee, Arvind Kejriwal Detained: दिल्लीत इंडीया आघाडीच्या तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आता इतर पक्षही रस्त्यावर उतरलेत. दिल्ली पोलिसांनी चार माजी मुख्यमंत्र्यांना ताब्यात घेतलंय. कोण आहेत हे माजी मुख्यमंत्री? राजकीय नेत्यांची कशी सुरू आहे धरपकड? पाहूया हा रिपोर्ट...
DelhiProtest
DelhiProtestsaam tv
Published On: 

राहुल गाधींच्या नेतृत्त्वात इंडिया आघाडीचं गेले तीन दिवस आंदोलन सुरू होतं. मात्र इंडिया आघाडीच्या काही घटक पक्षांनी सीजेपीच्या आंदोलनाच्या दिनी आपलं स्वतंत्र आंदोलन छेडलं. टीएमसीच्या ममता बॅनर्जींनी थेट जंतरमंतरवर घडक देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि व्हॅनमधून पोलीस स्टेशनला नेलं. यावेळ ममता बॅनर्जींनी जॉनी जॉनी कवितेतून सत्ताधारी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची खिल्ली उडवत निशाणा साधला.

आपचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही आपल्या पक्षाच्या आमदार-खासदारांसोबत जंतरमंतरवर जाण्यासाठी पायी मार्च काढला. मात्र त्यांना रस्त्यातच पोलिसांनी थेट उचलून नेत पोलीस व्हॅ्नमध्ये घातल. डाव्या पक्षांनीही जंतरमंतरवरच्या आंदोलनात सहभाग घेतला. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार आणि केरळचे माजी मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या सह सीपीआय आणि सीपीएमचे खासदारही आंदोलनात उतरले होते. या दोघांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं.

ऑल इंडिया स्टूडेंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा नेहा बोरा यांनी योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांच्यासह मार्च काढला.. त्यानंतर आपल्या समर्थकांसोबत जोरदार घोषणाबाजी करतांना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी नेहा बोरानं थेट बॅरिकेड्सवरून उडी मारली. मात्र त्यानंतर अखेर पोलिसांनी नेहाला ताब्यात घेतलं. भारतात परतलेला प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ध्रुव राठी यालाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. गुरुग्राममध्ये सकाळी साध्या वेशातील सुमारे 50 पोलीस कर्मचारी ध्रुव राठी याच्या निवासस्थानी पोहोचले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या आवाराबाहेर आंदोलन करणाऱ्या वकिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली होती. याची गंभीर दखल घेत सरन्यायाधीशांनी सर्व वकिलांची सुटका करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com