Shocking News : शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रुग्णाच्या नाश्त्यात चक्क मृत पालीचे मुंडके; अन्नसुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह, अकोल्यात खळबळ

Akola Hospital News: अकोल्यातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रुग्णाच्या नाश्त्यात चक्क मृत पालीचे मुंडके आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे अन्नसुरक्षा, स्वच्छता आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहील आहे.
Shocking News :  शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रुग्णाच्या नाश्त्यात चक्क मृत पालीचे मुंडके; अन्नसुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह, अकोल्यात खळबळ
Akola Hospital NewsSaam Tv
Published On
Summary
  • रुग्णाच्या नाश्त्यात पालीचे मुंडके आढळल्याने अकोल्यात खळबळ

  • नाश्ता रुग्णालयाबाहेरील रेस्टॉरंटमधून आणल्याचा आरोप

  • अन्नसुरक्षा विभागाकडून तपास सुरू, कारवाईची शक्यता

  • नागरिकांना उघड्यावरचे अन्न खाताना सतर्क राहण्याचे आवाहन

अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. क्रमांक ३२ वॉर्डमध्ये दाखल असलेल्या रुग्णाच्या नाश्त्यात चक्क मृत पालीचे मुंडके आढळून आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे रुग्णालय परिसरातील अन्नसुरक्षा, स्वच्छता आणि प्रशासनाची जबाबदारी यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्ण शेख सोहेल यांना सकाळच्या नाश्त्यासाठी पोहे दिले गेले. हा नाश्ता रुग्णालयाच्या स्वयंपाकगृहातून नव्हे, तर रुग्णालयाबाहेरील ‘अग्रवाल’ नावाच्या रेस्टॉरंटमधून आणण्यात आल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. पोहे खाताना सोहेल यांच्या लक्षात आले की, पोहेत काहीतरी विचित्र वस्तू आहे. बारकाईने पाहिल्यानंतर ती वस्तू मृत पालीचे मुंडके असल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार पाहताच सोहेल यांच्या तब्येतीवर परिणाम झाला, त्यांना मळमळ आणि उलट्या झाल्या.

Shocking News :  शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रुग्णाच्या नाश्त्यात चक्क मृत पालीचे मुंडके; अन्नसुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह, अकोल्यात खळबळ
Akola Police : दहशत माजविणाऱ्यांची उतरविली मस्ती; पोलिसांनी शहरातून काढली धिंड

या घटनेची माहिती नातेवाईकांनी तात्काळ रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. मात्र, घटनेनंतर एक दिवस उलटूनही संबंधित रेस्टॉरंटवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे नातेवाईकांसह नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. नातेवाईकांचा आरोप आहे की, रुग्णालय परिसरात अनेक रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत निकृष्ट स्थितीत आहेत. उघड्यावर ठेवलेले अन्न, धूळ, माशा आणि कीटक यामुळे रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

Shocking News :  शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रुग्णाच्या नाश्त्यात चक्क मृत पालीचे मुंडके; अन्नसुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह, अकोल्यात खळबळ
Akola News : भाविकांवर काळाचा घाला, भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, ८ जण गंभीर

अन्नसुरक्षा विभागाकडून या घटनेची प्राथमिक माहिती घेण्यात आली असून, अन्नाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दोषी आढळल्यास संबंधित रेस्टॉरंटचा परवाना रद्द करून दंडात्मक कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. रुग्णालय अधिष्ठात्यांनी मात्र सांगितले की, हा नाश्ता रुग्णालयातून पुरवण्यात आलेला नसून बाहेरून आणलेला होता. तरीही, रुग्णालय परिसरातील अन्नविक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आणि अन्नसुरक्षा विभागाशी समन्वय साधला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

Shocking News :  शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रुग्णाच्या नाश्त्यात चक्क मृत पालीचे मुंडके; अन्नसुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह, अकोल्यात खळबळ
Akola : अकोला पोलिसात खळबळ; कारवाई टाळण्यासाठी मागितली खंडणी, पोलिसांसह सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल

या घटनेनंतर शहरात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. रुग्णालयाबाहेरील उघड्यावर चालणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रीवर कोणतेही नियंत्रण नसल्याने अशा घटना घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांना उघड्यावर मिळणारे अन्न खरेदी करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रुग्णांसाठी तर स्वच्छ, गरम आणि पॅकबंद अन्नच आणावे, अन्यथा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

Shocking News :  शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रुग्णाच्या नाश्त्यात चक्क मृत पालीचे मुंडके; अन्नसुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह, अकोल्यात खळबळ
Akola : विद्यार्थ्यांची रिक्षात कोंबून वाहतूक; तपासणी करताना आमदार मिटकरींसोबत घातला वाद

एकंदरीत, रुग्णालय परिसरातील अन्नसुरक्षेची पडझड या घटनेमुळे उघड झाली असून, संबंधित विभागांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी जबाबदार असलेल्या यंत्रणांनी तातडीने पावले उचलून अशा प्रकारांना आळा घालण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Q

अकोल्यात नेमकी कोणती घटना घडली?

A

शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील रुग्णाच्या नाश्त्यात चक्क मृत पालीचे मुंडके आढळले.

Q

नाश्ता कुठून आणण्यात आला होता?

A

रुग्णालयाबाहेरील ‘अग्रवाल’ नावाच्या रेस्टॉरंटमधून.

Q

या घटनेनंतर कोणती कारवाई झाली आहे का?

A

अद्याप संबंधित रेस्टॉरंटवर कारवाई झालेली नाही, मात्र अन्नसुरक्षा विभाग तपास करत आहे.

Q

नागरिकांसाठी कोणती सूचना देण्यात आली आहे?

A

उघड्यावर मिळणारे अन्न खाताना विशेष काळजी घ्यावी आणि शक्यतो पॅकबंद, स्वच्छ अन्नच खावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com