Dahanu News: तुझ्या नवऱ्याला सरकारी नोकरी लावतो, भूलथापा देऊन भोंदूबाबाचा महिला पोलिसावर अत्याचार

Talasari Women Police: भोंदूबाबाने पीडित महिलेला ‘तुझ्या पतीला सरकारी नोकरी लावतो’ असे सांगून तिला तलासरी तालुक्यातील एका पडक्या घरात नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला.
Dahanu Crime News talasari Women Police constable Physical Abuse by bhondu Bhaba
Dahanu Crime News talasari Women Police constable Physical Abuse by bhondu BhabaSaam TV
Published On

Dahanu Women Police Physical Abuse: गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचारांच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. यामध्ये विवाहित महिलांवर अत्याचार होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. एकीकडे पोलीस अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळत असताना दुसरीकडे डहाणूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका भोंदूबाबाने महिला पोलीस कर्मचाऱ्यावरच अत्याचार केला आहे. (Latest Marathi News)

Dahanu Crime News talasari Women Police constable Physical Abuse by bhondu Bhaba
Beed Crime News: लग्नानंतरही बायको बॉयफ्रेंडशी फोनवर बोलायची; नवरा सांगून कंटाळला, शेवटी स्वतःलाच संपवलं

तुझ्या नवऱ्याला सरकारी नोकरी लावतो, घरात सुख-शांती राहील, असे सांगून भोंदूबाबाने आणि त्याच्या साथीदारांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यावर वारंवार बलात्कार (Crime News) केला. ही धक्कादायक घटना तलासरी तालुक्यात घडली. याप्रकरणी पीडित पोलीस कर्मचारी महिलेच्या तक्रारीवरून भोंदूबाबासह त्याच्या ४ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी (Police) आरोपींना अटक देखील केली आहे. रवींद्र नारायण बाटे (वय ४५) याच्यासह दिलीप गोविंद गायकवाड (वय ४२), गणेश रामजी कदम, महेंद्र चंदाराम कुमावत आणि गौरव साळवी, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

भोंदूबाबाने पीडित महिलेला ‘तुझ्या पतीला सरकारी नोकरी लावतो’ असे सांगून तिला तलासरी तालुक्यातील एका पडक्या घरात नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही. तर पूजाविधी करण्यासाठी महिलेला मठात बोलावलं. तिथे तिच्यावर अघोरी पूजा करत मित्रांसह मिळून पीडितेवर अत्याचार केला.

अत्याचारानंतर आरोपींनी पीडितेकडून २ लाख १० हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला. यानंतरही भोंदुबाबाने महिलेला सतत ब्लॅकमेल करणे सुरूच ठेवले. दरम्यान, सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पोलिस महिलेने तलासरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Edited by - Satish Daud

Dahanu Crime News talasari Women Police constable Physical Abuse by bhondu Bhaba
High Court News: माहेरच्यांशी बोलण्यावरून बायकोवर बंधने घालणे ही मानसिक क्रूरता; मुंबई हायकोर्टाचं मत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com