Sushma Andhare: ललित पाटील दादा भुसे ओळखतात, कॉल रेकॉर्ड चेक करा; सुषमा अंधारेंचा आरोप

Sushma Andhare: ड्रग्ज माफिया ललित पाटीलला दादा भुसे ओळखत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय.
Sushma Andhare
Sushma AndhareSaam Tv
Published On: 

Sushma Andhare on Dadaji Bhuse :

राज्यातील ड्रग्ज प्रकरणात आता राजकारणाचा शिरकाव झाला आहे. फरारी ड्रग्ज माफिया ललित पाटील काही दिवसांपूर्वी ससूनमधून फरारी झाला होता. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ड्रग्ज माफिया ललित पाटीलला दादा भुसे ओळखत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय. तर त्याआधी पुण्यातील आमदार रविंद्र धंगेकरांनीही ललित पाटीलच्या पळण्यामागे राज्यातील मंत्र्याचा हात असल्याचा आरोप केला होता.(Latest News)

ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी राज्याचे मंत्री दादा भुसे यांचा फोन गेला होता. त्यांचे त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. आपल्या एका फेसबुक पोस्टवरुन त्यांनी हे आरोप केले आहेत. दादा भुसे यांचा ललित पाटील सोबतचे फोटो आहेत. हे फोटो मातोश्रीमधील दिसत आहेत. परंतु जिल्ह्यातील येणारा व्यक्ती हा ओळखीचा असल्याचं प्रतिक्रिया सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. या आरोपांवर बोलातना दादा भुसे म्हणाले की, हे फोटो २०१६ सालचे आहेत.

या फोटोमध्ये जरी मातोश्री हे ठिकाण दिसत असेल तरी एखाद्या जिल्ह्यातून एखादी व्यक्ती येते, तेव्हा ती त्यासंबंधी जिल्ह्यातील बड्या नेत्याच्या मुळे आत प्रवेश करू शकते. या फोटोत दादा भुसे आणि ललित पाटील एकत्र दिसतात. याचा उघड अर्थ दादा भुसे यांनी ललित पाटील याला आत आणले असेल हे स्पष्ट आहे, असं अंधारे म्हणाल्या आहेत.

काय म्हणाल्या अंधारे

नाना पटोले यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना ललित पाटील च्या फरार होण्यामध्ये शिंदे गटाच्या एका आमदाराचा हात आहे असे म्हटलं होतं. तर आता काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिंदे गटाच्या एका मंत्राचा यात हात आहे, असा आरोप केला. त्यानंतर मी माध्यमांशी बोलताना श्री दादा भुसे यांचे कॉल रेकॉर्ड चेक करावेत, असं म्हटलं. शिंदे गटाचा आमदार किंवा मंत्री किंवा भुसे असे म्हणत जर वारंवार संशयाची सुई शिंदे गटावर जात असेल तर निश्चितपणे यावर गृह मंत्रालयाने बोललं पाहिजे. ललित पाटील हा ससून हॉस्पिटलमध्ये तब्बल नऊ महिने ऍडमिट का होता ?

कर्करोगाशी संबंधित अगदी केमोथेरपीची ट्रीटमेंट चालू असेल तरीसुद्धा तब्बल नऊ महिने सलगपणे रुग्ण रुग्णालयात दाखल करून घेतले जात नाही. मग ललित पाटील याला असा कोणता दुर्धर आजार होता ज्यामुळे तो तब्बल नऊ महिने हॉस्पिटलमध्ये होता. ललित पाटीलला रुग्णालयात दाखल करून घेताना ससूनचे डीन श्री काळे होते. श्री काळे यांनी कोणाच्या रेकमेंडेशनवरून त्याला दाखल करून घेतले आणि त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट काय होती?

Sushma Andhare
Sushma Andhare News: 'ड्रग्जमाफिया ललित पाटीलला दादा भुसेंचा सपोर्ट..' सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाल्या?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.