Sushma Andhare News: 'ड्रग्जमाफिया ललित पाटीलला दादा भुसेंचा सपोर्ट..' सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाल्या?

Sushma Andhare On Dada Bhuse: सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे आमदार दादा भुसे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.
 Sushma Andhare News
Sushma Andhare NewsSaamtv
Published On: 

सचिन जाधव, प्रतिनिधी!

Sushma Andhare News:

राज्यात सध्या ड्रग्ज माफिया ललित पाटील हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. पुण्याच्या ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात शिंदे गटाचे आमदार दादा भुसे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे, शेकडो कोटींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील (Lalit Patil) ससून रुग्णालयातून पळून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या त्याचा शोध सुरू असून ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील (Bhushan Patil) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी आता सुषमा अंधारेनी खळबळजनक आरोप केले आहेत.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

"ड्रग्जमाफिया ललित पाटील याला रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठी राजकीय दबाव टाकण्यात आला. यामध्ये दादा भुसे (Dada Bhuse) यांचा सहभाग असून दादा भुसे यांनीच फोन करुन ललित पाटीलला रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले..." असा गंभीर आणि खळबळजनक आरोप सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला आहे.

 Sushma Andhare News
Ajit Pawar News: अजित पवार यांचा पुणे जिल्हा बॅंक संचालकपदाचा राजीनामा; कारण काय?

याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, "काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी देखील सकाळी या प्रकरणात शिंदे गटाच्या आमदाराचा हात आहे. म्हणजेच याची माहिती सर्वांना आहे पण नाव कोणी घेतलं नव्हते. या प्रकरणात दादा भुसे यांच्या नावाभोवती संशयाचं धुकं असेल तर त्यांचे कॉल रेकॉर्ड का चेक केले जाऊ नयेत? त्यांना प्रश्न का विचारले जाऊ नयेत? " असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच ललित पाटील आणि दादा भुसे हे नाशिकचेच (Nashik) आहेत, दोघांचे जवळीक असल्याचाही दावा यावेळी सुषमा अंधारे यांनी केला. तसेच गृहखात्याची इच्छा असेल तर या प्रकरणाचा छडा लागेल असेही त्या म्हणाल्या. (Latest Marathi News)

 Sushma Andhare News
Maharashtra Politics: मराठवाडा विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.