Cylinder Blast : रोह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट; बाप आणि दोन मुली जखमी

Cylinder Blast : सिलेंडरच्या स्फोटात जखमी झालेल्यांना उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे.
Cylinder Blast :
Cylinder Blast :Saam Tv
Published On

Cylinder Blast :

रोहा तालुक्यातील वरसे भुवनेश्वर येथे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. यात घरातील तिघेजण गंभीररित्या होरपळले आहेत. जखमींना रोहा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे.(Latest News)

मनोहर घोसाळकर आणि त्यांच्या दोन मुली सायली आणि भावना अशी जखमींची नावे आहेत. या अपघातात घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून स्फोटाचे नेमके कारणे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज दुपारी घोसाळकर यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. बाप दोन मुली जखमी झाले आहेत. दरम्यान ठाण्यातील एका कंपनीतही सिलेंडरचा स्फोट झाला होता. वागळे इस्टेटमधील अंबिका नगर येथील सिलिकॉ सायंटिफिक कंपनीत स्फोट झाला होता.

परभणीतील जिंतूरमध्ये घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. स्फोटामुळे लागलेल्या आगीत घराचे मोठे नुकसान झाले होते. जिंतूर शहरातील बलसा रोडवरील बालासाहेब डोंब यांच्या घरातील स्वयंपाकघरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता. या आगीत स्वयंपाक घरातील फ्रीज , कपडे यासह अनेक वस्तू जळून खाक झाल्या होत्या.

Cylinder Blast :
Breaking : ठाण्यात आगडोंब! LPG गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com