LPG Cylinder Price Cut: मोदी सरकारची 'रक्षाबंधन' भेट! गॅस सिलेंडर २०० रुपयांनी स्वस्त होणार

LPG Cylinder Price Reduce: महागाईने त्रस्त सर्वसामान्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे.. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपयांनी घट केली आहे.
LPG Gas Cylinder Price Today
LPG Gas Cylinder Price TodaySaam Tv

Gas Cylinder Price Reduce: महागाईने त्रस्त सर्वसामान्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. घरगुती गॅस दरात मोठी कपात करण्याचा महत्वाचा निर्णय मोदी सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपयांनी घट केली आहे. सबसिडी स्वरुपात ही सूट मिळेल. १ तारखेपासून हे नवे दर लागू होतील.

LPG Gas Cylinder Price Today
Nandurbar News: पावसाने पाठ फिरवल्याने नंदूरबार जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती; शेतकऱ्यांचा समोर पिके जगवण्याचे मोठे आव्हान

याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरची (एलपीजी किंमत) 200 रुपयांनी कपात केली आहे. घरगुती गॅस सिलिंडरवर सरकारने 200 रुपये सबसिडी जाहीर केली आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना हे अनुदान दिले जाणार आहे.

उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडरच्या किमती 200 रुपयांनी स्वस्त होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

LPG Gas Cylinder Price Today
NCP On Maharashtra Drought Situation: राष्ट्रवादीने सरकारला धरले धारेवर, राज्यातील दुष्काळाचा पाढाच दाखवला वाचून

दरम्यान, गॅसवरील अनुदानाचा लाभ केवळ उज्ज्वला योजनेच्या (Ujjawala Gas Skim) लाभार्थ्यांनाच मिळणार असल्याचे केंद्र सरकारने गेल्या वर्षीच स्पष्ट केले होते. इतर कोणालाही स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर सबसिडी दिली जाणार नाही. उज्ज्वला योजनेंतर्गत, सरकार आधीपासून 200 रुपये अनुदान देत होते, आता 200 रुपये अतिरिक्त अनुदान मिळणार आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com