Nanded News: दुर्देवी! गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त, कर्ज काढून बांधले होते घर अन्...

Gas Cylinder Explosion: घरातील सगळेच साहित्य, मुलांची पुस्तके , काही पैसे आणि संसार उपयोगी वस्तु या आगीत खाक झाली आहेत.
Nanded News
Nanded NewsSaamtv
Published On

संजय सुर्यवंशी, प्रतिनिधी...

Nanded News: गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून खाक झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. नांदेड शहराजवळच्या नसरतपूर या गावात बुधवारी दुपारी ही घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र या स्फोटामध्ये घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. (Latest Marathi News)

Nanded News
Sushma Andhare News: 'फडणवीस काडतूस तर ठाकरी बाणा म्हणजे तोफ...' ठाण्याच्या सभेतून सुषमा अंधारे कडाडल्या; बावनकुळेंना दिले थेट आव्हान

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड शहराजवळच्या नसरतपूर गावातील जयभीम शिरसाठ हे मिस्त्रीचे काम करतात. सहा महिन्यापूर्वी त्यांनी पत्र्याचे घर बांधले होते. आज ते नेहमीप्रमाणे कामाला गेले होते. त्यांची दोन मुल 14 वर्षीय सौरभ आणि 11 वर्षीय रोहीत हे दोघे शाळेत गेले होते. त्यांच्या पत्नी अनिता ह्या एकट्याच घरी होत्या. दुपारी त्या गॅसवर स्वयंपाक करत होत्या.

यावेळी मावशीचा फोन आल्याने गॅसवर भाजी ठेवून त्या बाजूला राहणाऱ्या मावशीच्या घरी गेल्या. याचवेळी काही क्षणात सिलेंडरचा स्फोट झाला आणि घराला आग लागली. पालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझवली मात्र तो पर्यंत घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले.

Nanded News
Junnar Crime News: दुचाकीवरुन आले अन् दागिने ओरबाडून पळाले, भररस्त्यात धुम स्टाईल चोरी; थरारक घटना CCTVत कैद

या घटनेच्या वेळी घरात कोणी नसल्याने जिवीतहानी टळली. मिस्त्री काम करणारे जयभीम शिरसाठ यांनी एक - एक रुपया जोडून पत्र्याच घर बांधल होतं. त्यांच्या पत्नीने कर्ज काढून साड्याचा व्यवसाय सुरू केला होता. भीम जयंती असल्यानं त्यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. शिवाय ब्युटी पार्लरच साहित्य देखील त्यांनी खरेदी केलं होत.

मात्र या घटनेने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. घरातील सगळेच साहित्य, मुलांची पुस्तके , काही पैसे आणि संसार उपयोगी वस्तु या आगीत खाक झाली आहेत. (Nanded News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com