Aurangabad Crime : औरंगाबाद हादरलं! राज्यात पुन्हा परळीतील मुंडे गर्भपात प्रकरणाची पुनरावृत्ती

गर्भपात झालेल्या महिलेची प्रकृती चिंताजनक, डॉक्टर पती-पत्नी फरार
Aurangabad Crime News
Aurangabad Crime NewsSaam Tv

Aurangabad Crime News : औरंगाबादच्या जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातील चित्तेगाव इथल्या औरंगाबाद स्त्रीरोग रुग्णालयात बेकायदा गर्भपात केंद्र चालविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या रुग्णालयात गर्भपातानंतर एका २२ वर्षांच्या विवाहितेची प्रकृती बिघडल्याने तिला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

Aurangabad Crime News
Pune News: पुण्यातील रस्त्यांवर लवकरच डबलडेकर बस धावणार; कशी असेल बस?

या प्रकरणानंतर रुग्णालय चालविणारे डॉक्टर जाधव दाम्पत्य फरार झाले. चित्तेगाव येथील एका २२ वर्षीय विवाहितेला दोन मुली आहेत. ती तिसऱ्यांदा गर्भवती राहिली. यावेळी मुलगाच व्हावा, या आग्रहापोटी तिने लिंगनिदान करून घेतले, तेव्हा तिसऱ्यांदा मुलगीच होणार असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिने गर्भपात करण्याचे ठरवले.

ठरल्यानुसार चितेगाव येथील पांगरी रोडवर असलेल्या औरंगाबाद (Aurangabad) स्त्री रुग्णालयात डॉक्टर जाधव पती-पत्नींकडून तिने गर्भपात करवून घेतला. गर्भपातानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाल्याने तिची प्रकृती खालावली. त्यामुळे तिला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी (Doctor) तिला घाटीत जाण्याचा सल्ला दिला.

Aurangabad Crime News
Urvashi Dholakia Accident: अभिनेत्री उर्वशी ढोलकिया थोडक्यात बचावली, कारला स्कूल बसची जोरदार धडक

घाटी रुग्णालयातील डॉक्टरांकडून या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आरोग्य विभागाने चित्तेगाव येथील औरंगाबाद स्त्रीरुग्णालयावर छापा टाकला. महिलेला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिचा अवैध गर्भपात केल्याची माहिती समोर आली. आरोग्य विभागाने पोलिसांच्या मदतीने या डॉक्टरांच्या रुग्णालयावर छापा मारला.

मात्र, तोपर्यंत डॉक्टर दाम्पत्य फरार झाले. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. औरंगाबाद स्त्रीरुग्णालयावर आरोग्य विभागाने आणि पोलिसांनी छापा मारला. यावेळी पथकाला रुग्णालयात गर्भपात करण्याचे साहित्य आढळून आले आहे. सोबतच सरकारने बंदी घातलेली अनेक औषधेदेखील रुग्णालयात सापडली आहेत. तब्बल दोन तास पोलिस आणि आरोग्य विभागाकडून रुग्णालयाची झाडाझडती घेण्यात आली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com