Pune News: पुण्यातील रस्त्यांवर लवकरच डबलडेकर बस धावणार; कशी असेल बस?

डबलडेकर बसचे मार्ग निवडताना रस्त्यांची स्थिती तसेच प्रवाशांचा प्रतिसाद या बाबींचा प्रामुख्याने विचार केला आहे.
PUNE Mahapalika
PUNE Mahapalikasaam tv

Pune News : हडपसर, कात्रज, कर्वे रस्ता परिसरातील प्रवाशांना पाच ते सहा महिन्यांत डबलडेकर बसमधून प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. पीएमपीएमएल प्रशासन शहरातील ४० मार्गांवर इलेक्ट्रिक डबलडेकर बस सुरु करणार असून मार्गांची निश्चिती झाली आहे.

डबलडेकर बसचे मार्ग निवडताना रस्त्यांची स्थिती तसेच प्रवाशांचा प्रतिसाद या बाबींचा प्रामुख्याने विचार केला आहे. पीएमपीच्या आगामी बैठकीत हा विषय चर्चिला जाईल. त्यांनतर डबलडेकर बसच्या खरेदीला गती येईल.

PUNE Mahapalika
Mumbai Fire News : मुंबईतील सोमय्या हॉस्पिटलला आग; अग्निशमन दलाचे ७ वाहने घटनास्थळी

या मार्गांवर धावणार डबलडेकर

हडपसर-पुणे महापालिका हडपसर-कात्रज भोसरी-आळंदी भोसरी-निगडी कात्रज-हिंजवडी पुणे महापालिका-बालेवाडी पुणे स्टेशन - कोथरूड हडपसर-कोथरूड हडपसर - वारजे माळेवाडी.

PUNE Mahapalika
Mumbai University Exams : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाच्या स्थगित परीक्षांची तारीख ठरली

कशी असेल बस?

नव्या बसला दोन जिने असणार आहेत. जुन्या बसला केवळ एकच जिना होता.बस पूर्णपणे इलेक्ट्रिक व वातानुकूलित असणार आहे. प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी बसमध्ये उत्तम सस्पेन्शन असणार आहे. बसमध्ये डिजिटल तिकिटांची सोय असून लंडनमध्ये धावणाऱ्या बससारखा लुक देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com