अभिजित देशमुख, साम टीव्ही
Dombivali Crime News : वडिलांच्या आजारपणाला कंटाळून मुलानेच त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीच्या खंबाळपाडा भोईरवाडी येथे घडली आहे. शामसुंदर शिंदे असं मयत व्यक्तीचं नाव असून तेजस शिंदे असं हत्या करणाऱ्या मुलांचं नाव आहे. विशेष म्हणजे तेजसने स्वत: पोलीस स्टेशनला फोन करून आपण वडिलांची हत्या केल्याची माहिती दिली.
बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी तेजस शिंदे याला अटक केली आहे. तेजस वडिलांच्या आजारपणाला कंटाळला होता.
बुधवारी सायंकाळी आई बाहेर गेली असताना तेजस आणि त्याच्या वडिलांचा क्षुल्लक कारणावरून वाद झाला. यावेळी तेजसने रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यात दगडी जाते घातले आणि नंतर गळा चिरून वडिलांची हत्या केली. त्याने या गुन्ह्याची कबूल पोलिसांपुढे दिली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली पूर्व खंबाळपाडा भोईरवाडी परिसरात श्यामसुंदर शिंदे हे त्यांची पत्नी पत्नी आणि मुलगा तेजस यांच्यासोबत राहत होते. तेजस महाविद्यालयात शिकतो, तर शामसुंदर शिंदे हे निवृत्त कर्मचारी होते. गेल्या काही महिन्यांपासून शामसुंदर शिंदे आजारी होते. आजारपणामुळे ते चिडचिड करत होते. त्यामुळे तेजस आणि श्यामसुंदर यांच्यामध्ये सतत वाद होत होते. (Crime news)
आज शामसुंदर यांची पत्नी कामानिमित्त बाहेर गेली होती तेव्हा पुन्हा तेजस आणि श्यामसुंदर यांच्यात वाद झाला. या वादामुळे संतापलेल्या तेजसने शामसुंदर यांच्या डोक्यात दगडाचे जाते घातले. तेजस इथेच थांबला नाही. त्यानंतर त्याने शामसुंदर यांची चाकूने गळा चिरून हत्या केली.
यानतंर तेजसने आपण आपल्याच वडिलांचे हत्या केली असल्याचे टिळकनगर पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तेजसला ताब्यात घेतले आणि शामसुंदर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला. या घटनेमुळे डोंबिवली खंबाळपाडा परिसरात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.