भारत नागणे
पंढरपूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात Pandharpur भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. कोरोनाचा Corona संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनाने administration, पंढरपुरात बाहेर गावाहून येणा-या भाविकांची कोरोना चाचणी मोहिम हाती घेतली आहे. शहराकडे City येणाऱ्या प्रमुख मार्गावर १४ ठिकाणी एन्टिंजेन Antigen कोरोना चाचणी कॅम्प Camp सुरू करण्यात आलं आहे. Corona test campaign in Pandharpur on backdrop of Ashadi Wari
दिवसभर कोरोना तपासणी केली. या तपासणी मध्ये पंढरपुरात येणाऱ्या आणि शहरातून बाहेर जाणाऱ्या सुमारे ५८६ लोकांची कोरोना चाचणी Test करण्यात आली आहे. यामध्ये ३७ जण कोरोना बाधीत असल्याचे आढळून आले आहे. संकटामुळे यंदाची आषाढी एकादशीही प्रतिकात्मक पद्धतीने साजरी करण्यासाठी, प्रशासनाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. आषाढी एकादशीपूर्वी काय तयारी करावी लागेल, बाधीत झालेल्या संशयित कोरोना रूग्णांना patients तातडीने विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले आहे.
हे देखील पहा-
ही कोरोना चाचणी मोहिम आषाढी वारी पर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे, प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आषाढी वारीसाठी सरकारने मान्यता दिलेल्या पालख्या व पालख्यांसोबत येणारे वारकरी पालखीतळावर आल्यानंतर त्याठिकाणाहून पंढरपूरकडे येईपर्यंत, एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत काय काळजी घ्यायची यासंदर्भातील सूचना अधिकाऱ्यांनी दिले आहेत. Corona test campaign in Pandharpur on backdrop of Ashadi Wari
या काळात बाहेरुन येणाऱ्या वारकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. पंढरपुरामधील रस्ते दुरुस्ती देखील यावेळी करण्यात येणार आहे. वारकरी ज्या ठिकाणी थांबणार ते मठ व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray हे ज्या ठिकाणी थांबणार त्या ठिकाणचा सर्व परिसर, इमारतीचेही निर्जंतुकीकरण Disinfection करण्याच्या सूचना या देण्यात आले आहेत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.