Eknath Shinde News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या घटनेबाबत सभागृहात निवेदन दिले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले म्हणणं मांडले होते. एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा समाचार घेतला. सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेब याच्याशी तुलना केली होती, त्यामुळे एकनाथ शिंदे संतापले होते. त्यांनी सपकाळ यांनी तात्काळ माफी मागावी, अशी मागणी केली. दरम्यान, पोलिसांवर कोणताही हल्ला सहन केला जाणार नाही, कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. नागपूर राड्याप्रकरणी पोलिसांत पाच गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
हर्षवर्धन सपकाळ हे मुख्यमंत्र्यांची तुलना कुरूप शासक म्हणून औरंगजेबाशी करतात. औरंग्या देशद्रोही होता. औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांचा छळ केला, जीभ छाटली. मुख्यमंत्र्यांनी काय केलं. त्यांची जीभ छाटली का? डोळे काढले का? चामडी सोलली? कुणाची तुलना तुम्ही कुणाशी करता? औरंग्याची तुलना मुख्यमंत्र्यांसोबत कशी करता? हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे? अन्यथा त्यांनी केलेले कृत्य, ते औंरगजेबाचं समर्थन करतात, त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा क? असे एकनाथ शिंदे म्हणाले.
काँग्रेस अध्यक्षांनी तात्काळ माफी मगावी -
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान सहन करणार नाही. काँग्रेस अध्यक्ष यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे. अन्यथा त्यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपमान केला, मुख्यमंत्र्यांना औरंग्याची उपमा दिली म्हणून कारवाई केली जाईल. बोलताना तारतम्य बाळगावे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
ज्यांनी कायदा हातात घेतलाय, त्यांच्यावर कडक कारवाई सरकार करेल, अशी भूमिका सरकारने घेतली आहे. यापुढे औरंग्याचे उदात्तीकरण खपवून घेतलं जाणार नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले. मतांसाठी केलेले पाप कुठे फेडणार असेही शिंदे म्हणाले.
औरंगजेबाचे उदात्तीकरण का सुरू आहे?
या राज्यामध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण का सुरू आहे? कुणी सुरू केलं? कशासाठीसुरु केलं, याच्या मुळाशी सरकार जाईल. औरंगजेब हा चांगला प्रशासक होता, त्याच तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना अबू आझमी यांनी केली होती. त्यावेळी अबू आझमी यांना समज दिली होती.
छत्रपती संभाजी महाराज यांना ४० दिवस छळ करणाऱ्या औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं योग्य आहे का? औरंगजेबाचे उदात्तीकरण करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केल्यासारखे आहे. खऱ्या अर्थाने हा देशद्रोह आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
आम्ही कोणत्याही समजाच्या विरोधात नाही -
हा औरंग्या आपल्याकडे आला कशाला? आपल्या महाराष्ट्राचा घास घ्यायला आला. आपली मंदिरे उद्धवस्थ केले. आई-बहिणींची अब्रू लुटली. शंभू राजे सापडत नव्हते, त्यावेळी निष्पाप लोकांचे बळी घेतले. हा सर्व इतिहास असताना औरंगजेबाचे समर्थन करणं, उदात्तीकरण करणं योग्य नाही. आम्ही कोणत्याही समजाच्या विरोधात नाही. खरा देशभक्त मुस्लिम पण औरंग्याचे समर्थन करणार नाही. औरंग्याची क्रूरता, कौर्य हे दिसतेय, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
औरंग्या संत होता का? शिंदे संतापले
औरंग्या कोण लागते? संत होता का? कुणाचा नातेवाईक होता का? औरंगया हा महाराष्ट्राला लागेला कलंक आहे. राज्यात कितीतरी आंदलने होतात, नागपूरमध्येही आंदोलन झाले. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली. दोन्ही समजाला शांत केलं. रात्री ८ वाजता २-४ हजाराचा मॉब कसा जमतो. महाल परिसर,हसनापुरी इतर भागात लोक जमतात.. घरामध्ये दगड टाकले, रूग्णालय तोडले.. देवांचे फोटो जाळले, तुम्ही आंदोलन करा, लोकशाही मार्गाने आंदोलन करा.. कायदा कशाला हातात घेता, असे शिंदे म्हणाले.
नागपूरमध्ये सोमवारी विशिष्ट समुदायाला टार्गेट केले. डीसीपी अधिकारी जखमी होतात.. पेट्रोल बॉम्ब कुठून येतात.. गाड्या जाळल्या जातात. विशिष्ट ठिकाणी १०० बाईक पार्क व्हायच्या, काल त्या ठिकाणी एकही बाईक पार्क नव्हती. याचा अर्थ काय.. जाणीवपूर्वक , नियोजनपूर्व कट रचला होता. विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्यासाठी हा कट होता. पोलीस येईपर्यंत लोक जीव मुठीत धरून होते. पोलीस आल्यानंतर त्यांच्यावरही हल्ला केला. हे कसं सहन करायचे. ३३ पोलीस जखमी झाले आहे. याचा अर्थ काय घ्यायचा.. कायदा सुव्यस्था सरकारची, मुख्यमंत्र्यांची आहे, तशीच आपली आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.