Nagpur Violence: शांततेचा इतिहास ही नागपूरची विशेषता राहिली आहे, नागपूर दंगलीवर नितीन गडकरी काय म्हणाले? VIDEO

Nitin Gadkari: औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये दोन गटात दंगल झाली आहे. ही दंगल दगडफेक आणि जाळपोळ पर्यंत जाऊन पोहचली आहे. यासर्व प्रकरणावर नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

अफवा पसरल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीमध्ये नागपूरने नेहमी शांततेचा इतिहास ही नागपूरची विशेषता राहिली आहे. माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता प्रस्तावित करावी आणि रस्त्यावर येऊ नये आणि सगळ्यांनी पोलिसांना सहकार्य करावे. साळोख्याच वातावरण ठेवण्याची नागपूरची परंपरा आहे. त्या परंपरेनुसार आपल्या व्यवहार करावा. ज्या ज्या लोकांनी चुका केल्या असतील ज्यांनी काही बेकायदेशीर कृत्य केले त्यांच्यावर सरकार कारवाई करेल असा विश्वास सगळ्यांना देतो. माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भात सर्व माहिती मिळाली आहे. त्यामुळे आपण कुठल्याही आपण जर विश्वास न ठेवता सहकार्य करावे. प्रेमाचे वातावरण ठेवण्यात पोलिसांना सहकार्य करावे. अशी माझी नम्र विनंती आहे असे आवाहन केंद्रीय मंत्री तथा नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com