Nitin Gadkari: "जो करेगा जात की बात, उसको मारो कसके लाथ" नितीन गडकरी जातीवादाच्या मुद्यावर संतापले,

Nitin Gadkari Slams Caste Politics: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच परखड आणि रोखठोक मत मांडत असतात. अनेकदा ते सभेतच आपल्या नेत्यांचेही कान टोचण्यास मागेपुढे पाहत नाहीत. अशाच एका कार्यक्रमात त्यांनी जातीवादावर ठाम भूमिका मांडली.

नागपूरमध्ये एका दीक्षांत समारंभात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, इतर कुठल्याही समाजापेक्षा मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाची जास्त गरज आहे. दिवसातून एक वेळा नाही तर शंभरवेळा नमाज पठन करा. मात्र नमाज पठनाबरोबरच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचे आहे. इंजिनीयर, डॉक्टर, आयएएस तयार झाले तरच समाजाचा विकास होईल. कोणताही माणूस हा त्याच्या जात, पंत, भाषा लिंग आणि धर्मामुळे नाही तर त्याच्या गुणांमुळे ओळखला जातो.

यावेळी त्यांनी जातीच्या राजकारणावरही संताप व्यक्त केला.अनेक जातीचे लोक मला भेटायला येत असतात.मी त्या सगळ्यांना सांगितले की जो करेगा जात की बात, उसको कसके मारूंगा लाथ!" असा संताप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com