
सांगली : गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. जयंत पाटील मंत्रिपदासाठी भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चेदरम्यान जयंत पाटील आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एकाच व्यासपीठावर हजेरी लावली. व्यासपीठावर हजेरी लावल्यानंतर दोन्ही नेत्यांनी राजकीय चर्चांचा खरपूस समाचार घेतला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सांगलीच्या इस्लामपूरमध्ये एकाच व्यासपीठावर आले आहेत. यावरून माध्यमात आणि राजकीय सुरू असलेल्या चर्चेचा दोघांनी नितीन गडकरी आणि जयंत पाटील यांनी समाचार घेतला. आता नितीन गडकरीसाहेब राष्ट्रवादीत जाणार,अशा बातम्या किमान तयार करू नका. पत्रकारांनी एक बातमी सोडली आणि त्याच्यावर मोठमोठे लोक चिंतन करायला लागले आहेत. पण दोन पक्षांची माणसं एकाच वेळेस व्यासपीठावर येऊ शकत नाही. अशी धारणा पत्रकारांची झाली आहे, असा टोला त्यांनी लगावला.
जयंत पाटील यांच्या विधानानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही समाचार घेतला. 'जयंतराव, तुम्ही राजकारणाचा फार विचार करू नका. मला काही फरक पडला नाही. कोणाच्या लिहिण्यातून फार संवेदनशील व्हायचं नाही. शेवटी राजकारण असे आहे. माझी पार्टी माझ्याबरोबर आहे. माझे विचार माझ्या बरोबर आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितले, जोपर्यंत तुम्ही निवडून येत नाही. तोपर्यंत तुम्ही पक्षाचे आहात, असे गडकरी म्हणाले.
'आमदार झाल्यावर तुम्ही जनतेचे आणि देशाचे आहात. तसेच महाराष्ट्रात निवडणुकीपुरता राजकारण राहिले. निवडणुकीनंतर राजकारण झालं नाही. पंधरा दिवसात ज्यांच्यात दम असेल, त्यांनी दम मारून घ्ययचा असतो. आजचा कार्यक्रम हा राजकारणाचा नाही. तर जयंत पाटील माझे उत्तम मित्र आहेत. त्यामुळे मी या ठिकाणी आलो आहे. वैचारिक मतभेद निवडणुकीत असेल, पण मनभेद नसेल पाहिजेत,असंही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.