Congress MP Balu Dhanorkar Health News : बाळू धानोरकरांची तब्येत बिघडली, नागपूरमधील खासगी रुग्णालयातून दिल्लीला एअर लिफ्ट करणार

Congress MP Balu Dhanorkar Health News : उपचारासाठी त्यांना नागपूरहून दिल्लीला विशेष एअर ॲम्बुलन्सने नेले जाणार आहे.
Balu Dhanorkar
Balu DhanorkarSaam TV
Published On

Chandrapur News : चंद्रपूरचे काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडली आहे. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना नागपुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धानोरकर यांना आतड्यातील इन्फेक्शन झाल्यामुळे त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना नागपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक उपचारासाठी त्यांना नागपूरहून दिल्लीला विशेष एअर ॲम्बुलन्सने नेले जाणार आहे.

आजच त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. चंद्रपूरमधील त्यांचे मूळ गाव भद्रावती येथे हा अंत्यविधी पार पडला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com