Maharashtra Politics: 'शिंदेना संपवणार, नवीन उदय होणार, विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान; रोख कुणाकडे?

Vijay Wadettiwar On Shinde Leadership: 'शिंदेना संपवणार, नवीन उदय होणार', असे खळबळजनक विधान विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Maharashtra Politics: 'शिंदेना संपवणार, नवीन उदय होणार, विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान; रोख कुणाकडे?
Vijay Wadettiwar On Shinde LeadershiSaam Tv
Published On

'शिंदेना संपवणार, नवीन उदय होणार', असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केले आहे. 'शिंदेंची गरज आता संपली आहे असेच दिसत आहे. त्यामुळे त्यांना बाजूला सारतील आणि पुढे नवीन उदय येईल.', असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. 'शिंदेंना संपवणार, नवीन उदय होणार?' असे वक्तव्य करणाऱ्या विजय वडेट्टीवारांचा रोख नेमका कुणाकडे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'नाराजी दाखवून काही पदरात मिळेल हा प्रयत्न सुरू आहे. एकनाथ शिंदे यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट आहे. एकनाथ शिंदे यांची गरज संपली का? कदाचित ते बाजूला व्हावेत अशी भीती आहे. आता उद्धवजींना संपून शिंदेंना आणलं आणि आता शिंदेंना संपून नवीन 'उदय' पुढे येईल. तो उदय कुठला असेल. त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल ही सुद्धा परिस्थिती शिवसेनेच्या बाबतीत महाराष्ट्रात येईल.

Maharashtra Politics: 'शिंदेना संपवणार, नवीन उदय होणार, विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान; रोख कुणाकडे?
Nashik Congress: महापालिका निवडणुकीपूर्वी नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, वरिष्ठ नेत्या सोडणार पक्षाची साथ

तसंच, 'उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल ही शक्यता नाकारता येत नाही. कारण काही उदय दोन्ही डग्यावर हात मारून आहे. काही संबंध चांगले करून ठेवले आहे ते उद्याच्या उदयासाठीच आहे.', असे देखील मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.

Maharashtra Politics: 'शिंदेना संपवणार, नवीन उदय होणार, विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान; रोख कुणाकडे?
Congress vs BJP Clash : डॉ. आंबेडकर आणि संविधानाच्या मुद्द्यावरून आप,काँग्रेस-भाजप नगरसेवक भिडले; सभागृहातच केली एकमेकांना मारहाण, VIDEO

अजित पवार यांना पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका असं मी सांगितले होते, असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, 'अंगावर आल्यावर सगळे आठवते. त्यावेळेस का नाही आठवलं? पुढाकार कोणी घेतला. जाऊ नका मग काय सांगताय. पुढे तुम्हीच गेले. दादांसोबत जाणारा पहिला माणूस हा धनंजय मुंडे स्वतः होता.', असा टोला त्यांनी धनंजय मुंडे यांना लगावला.

Maharashtra Politics: 'शिंदेना संपवणार, नवीन उदय होणार, विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान; रोख कुणाकडे?
Eknath Shinde : विरोधक चारीमुंड्या चीत झालेत; लाडकी बहीण योजनेवरून एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा, Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com