माेदींच्या या सल्ल्यानेच देशात अवदसा आली : आमदार प्रणिती शिंदे

praniti shinde narendra modi
praniti shinde narendra modi
Published On: 

साेलापूर : काॅंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र माेदींवर निशाणा साधत ताटं वाजविण्यास सांगितल्यानेच देशात अवदसा आली अशी टीका केली आहे. देशात काेराेनामुळे लाखाे लाेक मृत्यूखी पडले त्यास पंतप्रधान माेदी हेच जबाबदार असल्याचा आराेप आमदार प्रणितींनी केला आहे. यापुर्वी आमदार प्रणिती praniti shinde यांनी पंतप्रधान माेदींवर narendra modi टीका करताना ते डेंग्यूचा डास असल्याचे म्हटले हाेते.

सोलापुरातील चंद्रनील सोशल फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात त्यांनी फाउंडेशनच्या कामाचे काैतुक केले. त्याच वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

आमदार शिंदे म्हणाल्या लहान मुले जेव्हा ताटांवर रेगा आेढतात त्यावेळी आई रागावते. आई पेक्षा आजी जास्त आेरडते म्हणते अरे काय करताेस अवदसा येईल. अगदी तसंच झालं देशात, आपल्याला ताटं वाजविण्यास सांगितलं आणि देशात अवदसा आली. एवढी लाेक मृत्यूखी पडली, काेण जबाबदार? असा प्रश्न उपस्थित करुन आमदार प्रणितींनी आपले देशाचे पंतप्रधान याला जबाबदार असल्याचा आराेप केला.

पुढे आमदार प्रणिती म्हणाल्या हे सर्व सुरु असताना पंतप्रधान एकदा पण जनते समाेर आले नाहीत. एका पण माध्यमांना समाेरे गेले नाहीत. घाबरतात ही माणसं. ज्या वेळेला मत मागायची असतात त्यावेळी येतात. लाज पण वाटत नाही. त्यांचे भुत पण मतदान यंत्रात जाऊन बसले आहे. अनेकांनी मला सांगितलं ताई आम्हांला हाताच मत दिलं पण भाजपला मतदान गेलं. आमदार प्रणितींच्या या वाक्यावर एकच हशा पिकला. आम्ही मतदान प्रक्रिया यंत्राएेवजी पुन्हा शिक्का पद्धतीने करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी नमूद केले.

praniti shinde narendra modi
'त्या' विद्यार्थ्यांसाठी उदय सामंतांनी घेतला महत्वपुर्ण निर्णय

आज आम्ही मत मागायला आलेलाे नाही, तुमच्यासाठी आलाे आहाेत असेही आमदार शिंदे यांनी नमूद केले. या कार्यक्रमास परिसरातील मान्यवरांसह नागरिक उपस्थित हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.