'त्या' विद्यार्थ्यांसाठी उदय सामंतांनी घेतला महत्वपुर्ण निर्णय

uday samant
uday samant
Published On
Summary

राज्याच्या तंत्र शिक्षण विभागांतर्गत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रम, विधी, आर्किटेक्चर अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता ‘सीईटी २०२१’ परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे.

सातारा : विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने सीईटी परीक्षा घेतली जाते. यंदाच्या सीईटी २०२१ परीक्षेसाठी आजपर्यंत ऑनलाइन अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची सुवर्णसंधी सरकारने उपलब्ध केली आहे. त्याबाबतची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत uday samant यांनी ट्विट करुन दिली आहे.

uday samant
कोरोनावरील औषध वर्षाअखेरीस येणार; शिराळ्यात निर्मीती

तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रम, विधी अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता सीईटी परीक्षांचे नियाेजन करण्यात आले आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ मिळावी अशी मागणी सरकारकडे करण्यात आली हाेती. त्यानूसार मंत्री सामंत यांनी मुदत वाढीचा निर्णय घाेषित केला आहे.

मंत्री सामंत यांनी आपल्या ट्विटमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज केलेला नाही असे विद्यार्थी १२ ते १६ ऑगस्ट कालावधीत अर्ज करु शकतील असं म्हटलं आहे. या निर्णयामुळे इच्छुक विद्यार्थ्यांसाठी आता पुन्हा एक नवी संधी प्राप्त झाली आहे.

याबराेबरच यापूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अर्जातील दुरुस्ती १४ ते १६ ऑगस्ट करता येईल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी mahacet.org येथे भेट द्यावी असे आवाहन मंत्री सामंत यांनी केले आहे.

दरम्यान ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी आणि विनंती काही विद्यार्थी मंत्री सामंत यांना करीत आहेत. काही विद्यार्थी परीक्षेची तारीख जाहीर केल्यानंतर पुन्हा अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देत आहात हे किती संयुक्तिक आहे असेही प्रश्न मंत्री सामंत यांच्या ट्विटवर करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com