सचिन वाझे माफीचा साक्षीदार बनला असून यामागे भाजपचे षडयंत्र - नाना पटोले

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Nana Patole
Nana Patole Saam TV
Published On: 

अमरावती : माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेचा (sachin vaze) माफीचा साक्षीदार अर्ज मुंत्रई सत्र न्यायालयाने (Mumbai session court) नुकताच मंजूर केला. त्यामुळे १०० कोटींच्या वसुली प्रकरणात सध्या तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. न्यायालयाच्या या निकालानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आलंय. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Nana Patole
मुंबईची चिंता वाढली, कोरोनाची आजची आकडेवारी धडकी भरवणारी

या प्रकरणावर माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरण ही भाजपची स्क्रिप्ट होती. आता वाझे माफीचा साक्षीदार बनला असून यामागे भाजपचे षडयंत्र होतं, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी भाजपवर केला आहे. अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात धनगर कार्यकर्ता परिषदेत पटोले बोलत होते.

माध्यमांशी बोलताना पटोले पुढे म्हणाले, सचिन वाझे प्रकरण पूर्णत:बनावट आहे.विधानसभेचा अध्यक्ष असल्यामुळे मला याविषयी मत नोंदविता आले नाही, वाझे प्रकरणातून राज्य मंत्रिमंडळ, महाराष्ट्राला बदनाम करण्याच काम भाजपने केलं. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरण ही भाजपची स्क्रिप्ट होती. आता वाझे हा माफीचा साक्षीदार बनला असून यामागे भाजपचे षडयंत्र होतं.

Nana Patole
यूपीच्या कानपूरमध्ये मोठा राडा; दोन गटात तुफान दगडफेक, पोलिसांचा हवेत गोळीबार

दरम्यान, मनीलाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत. १०० कोटी वसुली प्रकरणात मागच्या अनेक दिवसांपासून देशमुख कोठडीत आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून या प्रकरणाची उकल केली होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात याआधी सचिन वाझेचा हात असल्याची माहिती रिपोर्टमधून समोर आली होती.आता सचिन वाझे १०० कोटी वसुली प्रकरणात माफीचा साक्षीदार झाल्याने अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत.त्यामुळे सचिन वाझे कोर्टात आता काय साक्ष देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com