Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का, २५ वर्षे पक्षात काम केलेल्या माजी नगराध्यक्षाने हाती धरलं कमळ

Congress Faces Setback In Jat: सांगलीच्या जत तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर आणि त्यांच्या पती अशोक बन्नेनवर यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
Former Jat Municipal Chief Shubhangi Bannenwar joins BJP along with husband Ashok Bannenwar in presence of MLA Gopichand Padalkar  a major setback for Congress in Sangli district.
Former Jat Municipal Chief Shubhangi Bannenwar joins BJP along with husband Ashok Bannenwar in presence of MLA Gopichand Padalkar a major setback for Congress in Sangli district.Saam Tv
Published On

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजताच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये शनिवारी काँग्रेसचे नेते अशोक बन्नेनवर यांनी पत्नी माजी नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर यांच्यासह आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यामुळे पालिकेच्या निवडणुकीत शहरातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. यामुळे भाजपने अवलंबलेल्या धक्का तंत्राचा शहरात चर्चा सुरू आहे.

Former Jat Municipal Chief Shubhangi Bannenwar joins BJP along with husband Ashok Bannenwar in presence of MLA Gopichand Padalkar  a major setback for Congress in Sangli district.
शिंदे सेनेकडून ठाकरे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यांनी हाती धरलं धनुष्यबाण

माजी आमदार विक्रम सावंत यांना हा धक्का मानला जात आहे.अशोक बन्नेनवर हे सामाजिक कार्यकर्ते असून बहुजन समाजाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहीले जात आहे. याशिवाय, ते गेल्या पंचवीस वर्षांपासून शहराच्या राजकारणात ते सक्रिय आहेत. शिवसेनेतून त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरु केला. यशवंत सेना, रासपचे काम करीत २०१० साली कॉंग्रेसमध्ये सक्रीय झाले. माजी आ. विक्रम सावंत यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी पत्नी शुभांगी यांना एकदा ग्रामपंचायत सदस्य, पालिकेच्या पहिल्या निवडणुकीत नगरसेविका म्हणून निवडून आल्या.

Former Jat Municipal Chief Shubhangi Bannenwar joins BJP along with husband Ashok Bannenwar in presence of MLA Gopichand Padalkar  a major setback for Congress in Sangli district.
भीषण अपघात! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस थेट १५० फूट खोल दरीत कोसळली, एकाचा मृत्यू

सौ शुभांगी या २०१७ साली जनतेतून पहिल्या नगराध्यक्षा बनल्या. या कालावधीत त्यांनी शहराच्या विकासात मोठ्या प्रमाणात भर घातली. शहरात त्यांचा मोठा गटही आहे. त्यांनी आज आपल्या समर्थकांसह आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भाजपला शहरात मोठी ताकद मिळणार आहे. यावेळी भाजप ज्येष्ठ नेते डॉ. रवींद्र आरळी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे, चंद्रशेखर गोब्बी, सुभाष गोब्बी , शहराध्यक्ष अण्णा भिसे, महिला शहराध्यक्षा ज्योती घाडगे, बांधकाम सभापती परशुराम मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, विक्रम ताड, राजू यादव, किरण शिंदे, डॉ. प्रवीण वाघमोडे, प्रमोद हिरवे, पापा कुंभार, संतोष मोटे, अतुल मोरे, रवी मानवर, प्रकाश मोटे, विनायक गारळे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Former Jat Municipal Chief Shubhangi Bannenwar joins BJP along with husband Ashok Bannenwar in presence of MLA Gopichand Padalkar  a major setback for Congress in Sangli district.
भाजपात पक्ष प्रवेशाचा धडाका; शिवसेना ठाकरे गट अन् काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या हाती कमळ

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, आतापर्यंतच्या जिल्ह्याच्या राजकारणात प्रस्थापित आणि विस्थापित असे दोन गट आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायती, सहकारी बँका, सोसायट्या, कारखाने यांच्यावर प्रस्थापितांचे वर्चस्व राहिले आहे. परिणामी सर्वसामान्य लोक विकासापासून दूर राहिले. मात्र २०१४ साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. जत तालुक्यासह शहराला विकासापासून लांब ठेवण्याचे काम या प्रस्थापितांनी केले. त्यांना कंटाळून शहराचा कायापालट व्हावा या दृष्टिकोनातून आज अशोक बन्नेनवर, माजी नगराध्यक्ष शुभांगी बन्नेनवर आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे शहरात भाजपला मोठे बळ मिळेल.

Former Jat Municipal Chief Shubhangi Bannenwar joins BJP along with husband Ashok Bannenwar in presence of MLA Gopichand Padalkar  a major setback for Congress in Sangli district.
Matoshree : मातोश्रीवर नजर ठेवली जातेय, ठाकरेंच्या नेत्यांचा गंभीर आरोप, तो व्हिडिओ केला पोस्ट

अशोक बन्नेनवर म्हणाले, गेल्या २५ वर्षांपासून राजकारणात आहे. आमच्या घराण्याने ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक आणि नगराध्यक्ष अशी पदे भूषविली आहेत. या काळात शहरातील प्रत्येक प्रभाग, प्रभागात कोट्यवधीची विकासकामे केली आहेत. त्यामुळे शहरातील जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. सत्ता असल्याशिवाय विकास होत नाही म्हणूनच पुन्हा जनतेची सेवा करण्यासाठी भाजपात प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com