काँग्रेस जिल्हाध्यक्षांना मार्शल आर्ट ट्रेनिंग; नाशिकच्या प्रशिक्षणात राहुल गांधींचाही सहभाग

Rahul Gandhi To Guide Newly Appointed: विरोधी पक्षनेते राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात राहुल गांधी काँग्रेसच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन करणार आहेत. राहुल गांधींच्या मार्गदर्शनाआधी जिल्हाध्यक्षांना खास प्रशिक्षणही देण्यात आलंय...
Rahul Gandhi Nashik visit Congress district presidents martial arts training
Rahul Gandhi Nashik visit Congress district presidents martial arts trainingsaam tv
Published On

काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या नाशिक दौऱ्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. पुण्यातील छात्रो की गूंज कार्यक्रमानंतर राहुल गांधी पुन्हा एकदा महाराष्ट्रात येणार आहेत. जेन झी आंदोलनानंतर राज्यातही काँग्रेस चांगलीच अॅक्टिव्ह झालीये. संघटन सृजन अभियानांतर्गत निवड झालेल्या राज्यातील 78 नवनियुक्त काँग्रेस जिल्हाध्यक्षांचं निवासी प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. या शिबिराचं बुधवारी समारोप होणार असून काँग्रेस नेते राहुल गांधी विशेष मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे, राहुल गांधींच्या दौऱ्याआधी काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या शिबिरात नेमकं काय घडतय? तेही पाहूयात...

संघटन सक्षम आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने गंगापूर धरण येथील MTDC रिसॉर्टमध्ये काँग्रेसचं शिबीर सुरू आहे. या शिबीरात नेत्यांना सैद्धांतिक, मानसिक आणि शारीरिक प्रशिक्षणाचे धडे दिले जाताहेत. विशेष म्हणजे, या शिबिरात जपानी मार्शल आर्टस् प्रशिक्षण आणि शारीरिक कौशल्याचा सराव करून घेण्यात आला. केवळ शारीरिक कसरतींवर भर न देता मन शांत ठेवणे, रागावर नियंत्रण कसे मिळवायचे, याचेही धडे देण्यात आल्याचं बोललं जातंय.

विशेष म्हणजे, राहुल गांधींकडून मार्शल आर्ट्स प्रशिक्षण घेण्यासाठी ईशान्य भारतातील 18 विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी मंडळ दिल्लीतील एका विशेष सत्रात सहभागी झालं होतं. इतकंच नव्हे तर राहुल गांधींचा मार्शल आर्ट्सशी दीर्घकाळचा संबंध आहे. आत्मसंरक्षण आणि संतुलनाच्या तंत्रांवर आधारित असलेल्या आयकिडो या पारंपरिक जपानी मार्शल आर्टमध्ये राहुल गांधींकडे ब्लॅक बेल्ट आहे. राहुल गांधींचेच प्रशिक्षक अरुण यांनीच महाराष्ट्रातील नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना प्रशिक्षण दिलंय. त्यामुळे नाशिक दौऱ्यात राहुल गांधी आणि काँग्रेस जिल्हाध्यक्षांमध्ये मार्शल आर्टस् सामना रंगणार का?... याची उत्सुकता सर्वांना लागलीये...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com