CM Eknath Shinde on Sanjay Raut
CM Eknath Shinde on Sanjay RautSaam tv

CM Eknath Shinde on Sanjay Raut: 'राऊत आले नाहीत का?' CM शिंदेंनी पत्रकार परिषदेत संजय राऊतांना लगावला टोला

CM Eknath Shinde on Sanjay Raut: पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत आले नाहीत का? असा खोचक सवाल करत टोला लगावला.
Published on

CM Eknath Shinde News:

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मराठवाड्यासाठी महत्वाच्या घोषणा केल्या. तसेच यावेळी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत आले नाहीत का? असा खोचक सवाल करत टोला लगावला. (Latest Marathi News)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक पत्रकार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. संजय राऊतांनी उपस्थित राहणार असे जाहीर केल्यामुळे मुख्यमंत्र्यांची परिषद वादळी ठरण्याची चर्चा सुरु होती.

CM Eknath Shinde on Sanjay Raut
Cabinet Meeting: मंत्रीमंडळ बैठकीतून मराठवाड्याला मोठं गिफ्ट; मुख्यमंत्र्यांकडून ४५ हजार कोटींच्या विकासकामांची घोषणा

मराठवाड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी मोठ्या घोषणा केल्या.

मुख्यमंत्र्यांनी सिंचन प्रकल्पावर १४ हजार कोटी, सार्वजनिक बांधकामासाठी 12 हजार 938 कोटी, ग्रामविकाससाठी 1 हजार 191कोटी, कृषीविभागासाठी 709 कोटी, तसेच वैद्यकीय विभागासाठी 498 कोटी खर्च करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरपत्रकार परिषदेत राऊत आले नाहीत का? असा सवाल करत टोला लगावला.

संजय राऊत काय म्हणाले होते?

मुख्यमंत्र्याच्या मराठवाड्यातील पत्रकार परिषदेत संधी दिल्यास एक पत्रकार म्हणून उपस्थित राहू. समोरासमोर प्रश्न विचारू. आम्ही देखील पत्रकार आहोत. पोलिसांनी अडवले नाही तर मी पत्रकार परिषदेत जाईन, असे ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी जाहीर केले होते. तसेच पत्रकार म्हणून प्रश्न विचार असल्याचे जाहीर केले होते.

CM Eknath Shinde on Sanjay Raut
Aditya Thackeray News: 'सरकारकडून अपेक्षा नाहीत; नेत्यांमध्ये मंत्रिपदासाठी भांडणे...' आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com