Ashadhi Wari 2022 : वारकऱ्यांसाठी CM एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, वारीला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी

कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde saam tv
Published On

रुपाली बडवे

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आषाढी एकादशीच्या अनुषंगाने वारकऱ्यांच्या सोयसुविधेचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीनंतर कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जाहीर केला आहे. ( Eknath Shinde News In Marathi )

Eknath Shinde
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विद्यापीठाचा मुख्यमंत्र्याना सल्ला

आज, बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या अनुषंगाने वारकऱ्यांच्या सोयीसुविधेसाठी आढावा बैठक घेतली. या बैठकीत मुख्य सचिव आणि इतर अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर (Pandharpur) येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे. तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही मुख्य सचिवांना दिले आहेत.

Eknath Shinde
Satara : फलटणसह साता-यात काेविड बाधितांची संख्या वाढू लागली; मास्क वापरा धाेका टाळा

दरम्यान, गेल्या दोन वर्षात कोव्हिडमुळे वारी झाली नाही. त्यामुळे यावर्षी अधिक वारकरी या वर्षी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य, स्वच्छता यावर भर देण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिल्या आहेत. खड्डा होऊन अपघात झाला नाही पाहिजे, यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचना सर्व यंत्रणांना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढीच्या महापूजेचे निमंत्रण

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या महापूजेचे निमंत्रण दिले. निमंत्रण देताना मंदिराच्या समितीच्या वतीकडून वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com