शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विद्यापीठाचा मुख्यमंत्र्याना सल्ला

महाराष्ट्र राज्य शेतकरी आत्महत्या करणार असल्याची मुख्यमंत्री शिंदेंनी घोषणा केली होती.
Chief Minister Eknath Shinde
Chief Minister Eknath ShindeSaam TV

अकोला : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शपथविधीनंतर पहिलीच घोषणा केली, ती म्हणजे 'शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र' करण्याची दरम्यान यावर अकोल्याच्या (Akola) कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांना विचारले असता आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे आदेश सुचना शासनाकडून प्राप्त झाल्या नसल्याचं सांगितलं आहे.

अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू विलास भाले यांनी, शेतकरी आत्महत्या रोखण्यापासून सरकारने काय करावे, याचा सल्लाही सरकार दिला आहे. नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जोरदार भाषण करत शेतकरी आत्महत्या मुक्त राज्य करणार असल्याची घोषणा केली. राज्यातील चार कृषी विद्यापीठापैकी एक कृषी विद्यापीठ विदर्भात आहे. (Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University)

पाहा व्हिडीओ -

मात्र, शेतकरी आत्महत्येच्या पिकाने तर विदर्भावरचं सारं आकाशच अंधारून गेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य शेतकरी आत्महत्या मुक्त करणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी केलेली घोषणा पूर्णत्वास जाण्याची गरज आहे. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भाले यांनी वाढत असलेला उत्पादन खर्च आणि उत्पन्न कमी यामुळे नैराश्यातुन आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले जात असल्याचे सांगितले. तसंच सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतीवर आधारित उद्योगधंदे उभारणे गरजेचं असल्याचा सल्लाही त्यांनी यावेळी सरकारला दिला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com