शरद पवारांच्या फोननंतर पडळकरांवर कारवाई होणार का? मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Fadnavis Warns BJP MLA Padalkar: गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर जहरी टीका. शरद पवारांचा फडणवीसांना फोन. फडणवीसांनी पडळकरांचे टोचले कान.
Fadnavis Warns BJP MLA Padalkar
Fadnavis Warns BJP MLA PadalkarSaam
Published On
Summary
  • गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर जहरी टीका.

  • शरद पवार नाराज.

  • फडणवीसांना फोन करून तक्रार.

  • फडणवीसांकडून पडळकरांची कानउघाडणी.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर जहरी टीका केली होती. तसेच एकेरी उल्लेख केला. पाटलांवर झालेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. तसेच 'बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा', असं पवार म्हणाले. या प्रकारानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषदेत पडळकरांना समज दिली.

जयंत पाटलांवर केलेल्या जहरी टीकेवर फडणवीसांनी पडळकरांची कानउघाडणी केली. 'गोपीचंद पडळकरांनी केलेलं वक्तव्य योग्य होतं, असं माझं मत नाही. कुणाच्या वडील किंवा परिवारावर टीका करणं योग्य नाही. यासंदर्भात मी गोपीचंद पडळकरांशी बोललो आहे. मला शरद पवार यांचा फोन आला होता. त्यांच्याशी मी बोललो, अशा प्रकारच्या विधानाचं आम्ही कधीही समर्थन करणार नाही, असं त्यांना सांगितलं', असं फडणवीस म्हणाले.

Fadnavis Warns BJP MLA Padalkar
'ठाणे यांच्या बापाची आहे का?', संजय राऊत कडाडले, शिंदे गटाला खडेबोल सुनावले

'पडळकरांना सांगितले की, आपण जे काही बोलत आहोत, त्याचे काय अर्थ निघतील, याचा विचार करायला हवा, असा सल्ला त्यांना दिला', असं फडणवीस म्हणाले.

Fadnavis Warns BJP MLA Padalkar
प्रायव्हेट फोटोवरून ब्लॅकमेल, छळाला कंटाळून प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती उघड

पडळकर वक्तव्यावर ठाम

भाजप आमदार पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर जहरी टीका केली. यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं. विरोधकांनी पडळकरांविरोधात राज्यभरात आंदोलन छेडलं. यानंतर नाराज शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. तसेच 'बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा', असं सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पडळकरांचे कान टोचले होते. फडणवीसांनी आज पडळकरांना फोन करून कानउघाडणी करत सल्ला दिला.

Fadnavis Warns BJP MLA Padalkar
रत्नागिरीच्या MIDCमध्ये वेश्याव्यवसाय, पुण्यातील २ तरूणींच्या मदतीनं देहविक्री सुरू; पोलिसांकडून पर्दाफाश

मात्र, आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याची माहिती आहे. 'माफी मागायचा काय विषय येत नाही', असं पडळकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com