मुख्यमंत्र्यांचा शिंदेसेनेला दे धक्का! मंत्र्यांचे अधिकार काढले, महायुतीत वाद पेटणार?

Fadnavis Gives Fresh Setback to Eknath Shinde Sena: फडणवीसांनी पुन्हा एकदा शिंदेसेनेच्या मंत्र्याचे अधिकार काढून घेतले आहेत. मंत्र्याचे अधिकार सचिवाला देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी कोणत्या मंत्र्याच्या अधिकारांना कात्री लावलीय? अधिकार काढून घेण्याचा निर्णय का घेण्यात आला? पाहूयात हा रिपोर्ट...
FADNAVIS CURBS DADA BHUSE'S POWERS
FADNAVIS CURBS DADA BHUSE'S POWERSsaam tv
Published On: 

महायुतीमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत वादाचा वणवा भडकण्याची शक्यता आहे. त्याला निमित्त ठरलयं, मुख्यमंत्र्यांनी शिंदेसेनेच्या मंत्र्यांच्या अधिकारावर चालवलेली कात्री... होय आता खासगी शाळांच्या मान्यतेचा आणि महत्वाच्या निर्णयाचा अधिकार थेट सचिवांना देऊन शिंदेसेनेच्या मंत्र्यांना धक्का दिलाय. या निर्णयामुळे महायुतीत राजकीय वादाची ठिणगी पडलीय. शिक्षणमंत्री दादा भुसेंना धक्का देणारा नेमका कोणता निर्णय झालाय. पाहा,

मुख्यमंत्र्यांनी शिक्षणमंत्र्यांचे अधिकार काढले

खासगी शाळांच्या मंजुरीचे अधिकार शिक्षणमंत्र्यांकडून काढले

शाळांच्या दर्जावाढीचे सर्व अधिकार आता प्रधान सचिवांना

मोठ्या शहरांतील CBSE शाळांचे अधिकारही प्रधान सचिवांकडे

इतर शाळांच्या परवानगीचे अधिकार शिक्षण आयुक्तांना

नवीन तुकडी, शाखा सुरू करण्याच्या मान्यतेचे अधिकार शिक्षण आयुक्तांना

प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचं सांगण्य़ात येतय. या निर्णयाला तातडीनं लागू कऱण्यासाठी जीआर काढण्यात आलाय़. मात्र छोट्या कामांसाठी मंत्रालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा दस्तुरखुद्द दादा भुसेंकडून करण्यात आलाय,

शिंदेसेनेच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी धक्का देण्याची ही काही पहिली वेळ नाही.,..

मुख्यमंत्र्यांनी शिंदेंना दिलेले धक्के (फडणवीस आणि एकनाथ शिंदे फोटो)

1.

दादा भुसे (शालेय शिक्षण मंत्री) -

शाळांना अतिरिक्त तुकड्या, शाळा मान्यता आणि दर्जावाढीचे अधिकार सचिवांना

2.

प्रताप सरनाईक (परिवहन मंत्री) - परिवहन विभागाच्या फाईल्स आणि निर्णयांवर थेट मुख्यमंत्र्यांचं नियंत्रण

3

प्रताप सरनाईक (परिवहन मंत्री) - मराठी भाषा सक्तीचा सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी बदलला

4.

निलम गोऱ्हे, उपसभापती

शंभूराज देसाईंना झालेल्या धक्काबुक्कीनंतर पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या आदेशाला स्थगिती

5.

शिंदेसेनेचे मंत्री

संजय राठोड, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाईं

शिंदेसेनेच्या मंत्र्यांच्या मर्जीतील जुने स्वीय सहाय्यक आणि OSD हटवले

नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा झालेला दारुण पराभव असो, किंवा त्यानंतर चव्हाट्यावर आलेला अंतर्गतकलह असो... महायुतीत शह-काटशहाचे राजकारण आता लपून राहिलेले नाही. जरी वरवर सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात असला, तरी विरोधकांशी लढण्याऐवजी महायुतीमधील नेतेच एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न असल्याच चित्र या निमित्तानं पुन्हा पाहायला मिळालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.