Devendra Fadnavis : खेळाच्या मैदानासाठी CM देवेंद्र फडणवीस रणांगणात; नागपुरात केली मोठी घोषणा

Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात खेळाच्या मैदानासाठी मोठी घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी तब्बल १५० कोटी रुपयांची घोषणा केली.
Devendra Fadnavis news
Devendra FadnavisGoogle
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूर : नागपुरात छोटे छोटे मैदान निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. नागपुरात खेळासाठी मैदान तयार करण्यासाठी १५० कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे. नागपुरातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एम्समध्ये एम्स आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने पहिली आदिवासी आरोग्य आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'खेळात हार जीत महत्त्वाची नसते. तर खेळाची भावना महत्त्वाचं असणं गरजेचं असतं. हारल्यानंतरही पुन्हा जिंकण्याची भावना मनात ठेवणे हे गरजेचं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरला खासदार सांस्कृतिक महोत्सवी दिला. तसेच खासदार क्रीडा महोत्सवी दिला. यामुळे नागपुरातील सांस्कृतिक आणि खेळ या दोन्ही दृष्ट्या नागपूर शहर पुढे जाण्याच्या मार्गावर राहील'.

'महोत्सवामध्ये अनेक खेळाडूंना सन्मानित केलं जातं. त्यासोबतच अनेक खेळाडूंचा गौरव केला जातो. यामुळे नागपुरातील सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील विविध कलाकार आणि खेळाडूंचा गौरव केला जातो. आम्ही नितीन गडकरी यांच्या आग्रहामुळे विविध खेळांसाठी छोटे छोटे मैदान तयार करून नागपुरातील खेळाडूंसाठी चांगल्या पद्धतीचे मैदान तयार करण्याचे काम नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात केले आहेत, असे फडणवीस पुढे म्हणाले.

नितीन गडकरी काय म्हणाले?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, 'खासदार महोत्सवाचे सातवे वर्षे पूर्ण केल्यामुळे मला खूप आनंद आहे.. या खेळ महोत्सवात २१ दिवस ५८ प्रकारचे खेळ खेळले गेले, त्यात 96 मैदान होते. १.५ कोटी पेक्षा जास्त रुपयांचे आहे'.

'विदर्भातील खेळाडू हे राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले पुरस्कार मिळावे, हेच या खेळ महोत्सवाची भावना आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मैदानासाठी खूप मदत केली आहे. त्यामध्ये शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांची मैदान तयार केली आहे,असे ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com