भाजप - अजित पवार गटातील बड्या नेत्यांचे पुतणे भिडले, बीडच्या गेवराईत तणावपूर्ण वातावरण, नेमकं घडलं काय?

Tension in Georai as Supporters of Former and Sitting MLAs Clash: बीडच्या गेवराईत मतदानादरम्यान पवार पंडित गटात पुन्हा एकदा संघर्ष उसळला. दोन्ही गटातील पुतण्यांमध्ये मारहाणीचा प्रकार.
Tension in Beed Georai
Tension in Beed GeoraiSaam
Published On

राज्यात नगरपरिषद तसेच नगरपंचायत निवडणुकांची मतदान प्रतिक्रिया पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर बीडमध्येही राजकीय रणधुमाळी पाहायला मिळत आहे. मात्र, बीडमधील काही भागांत बोगस मतदानाचा प्रयत्न झाला आहे. तर, काही ठिकाणी मतभेद आणि मारहाणीचा प्रकार घडला आहे. दरम्यान, बीडच्या गेवराईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप आमने सामने आले आहेत.

बीडच्या गेवराईमध्ये पवार - पंडित यांचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांचे पुतणे तसेच भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे पुतणे या दोघांमध्ये मारहाणीचा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या गेवराईमध्ये मोंढा नाका परिसरात पवार पंडित यांच्या पुतण्यांमध्ये बाचाबाची झाली.

Tension in Beed Georai
मतदानाच्या दिवशी बदलापुरात राडा! भाजप- शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये WWF, VIDEO व्हायरल

माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे पुतणे शिवराजे पवार आणि विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांचे पुतणे पृथ्वीराज पंडित दोघांमध्ये मारहाण झाली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले.

Tension in Beed Georai
कोल्हापुरात तृतीयपंथी अन् पोलिसांमध्ये राडा; बॅलेट युनिट बदलल्याचा आरोप, VIDEO समोर

पोलिसांनी जमावावर लाठीमार करत गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. बीडच्या गौराई मतदानाला हिंसक वळण आल्यानं परिसरात खळबळ उडाली असून, काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

Tension in Beed Georai
मसाज पार्लरच्या आड सेxxx रॅकेट; तरूणींना वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ढकललं, नवी मुंबईत ६ युवतींची सुटका

बीडच्या परळीत बोगस मतदानाचा प्रयत्न

बीडच्या परळीत बोगस मतदानाचा प्रयत्न झाला आहे. हा बोगस मतदानाचा प्रयत्न शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने हाणून पाडलाय. शरद पवार गटाचे राजाभाऊ फड आणि दीपक देशमुख यांनी आक्रमक होत संबंधित तरूणाला मतदान केंद्राच्या बाहेर हाकलले. परळी शहरातील प्रभाग क्र. १२ मधील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय येथील मतदान केंद्रावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून बोगस मतदान करण्याचा प्रयत्न सुरू होता. राजेभाऊ फड व दीपक देशमुख यांची मतदान केंद्रास भेट.

Tension in Beed Georai
प्रसिद्ध इन्फ्लुएंसरचा MMS व्हिडिओ लीक; तरूणासोबतचे १९ मिनिटं कॅमेऱ्यात कैद, तरूणी म्हणाली..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com