Jalna Latest Crime News: जालन्यात पाण्याच्या पाईपवरून दोन गटात तुंबळ हाणामारी, 18 ते 19 जण गंभीर जखमी

Jalna Crime News: जालन्यात पाण्याच्या पाईपवरून दोन गटात तुंबळ हाणामारी
Jalna Latest Crime News
Jalna Latest Crime NewsSaam Tv

Jalna Latest Crime News: जालन्यातील बदनापूर तालुक्यातील रोशन गावात बाथरूमच्या पाण्याचा पाईप टाकल्याने रस्ता बंद झाल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन्ही गटातील 18 ते 19 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा आरोग्य रुग्णालयात उपचासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Jalna Latest Crime News
Narayan Rane On Aditya Thackeray: 'कोण आदित्य ठाकरे? बालिश आहे तो', नारायण राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला!

मिळालेल्या माहितीनुसार, बदनापूर तालुक्यातील रोशन गावातील कुरेशी आणि सय्यद या गटात हा वाद झाला होता. कुरेशी यांनी बाथरूमचा पाईप सार्वजनिक रस्त्यात खोदून त्यावर सिमेंट लावून टाकला असल्यामुळे दोन दिवसापासून हा रस्ता बंद होता. त्यामुळे जाब विचारण्यासाठी गेलेल्या सय्यद कुटुंबाशी त्यांचा वाद झाला. (Latest Marathi News)

या वादातून रात्री उशिरा परस्पर विरोधी तक्रारीवरून बदनापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आज सकाळी कुरेशी यांनी सिल्लोड तालुक्यातील आपल्या नातेवाईकांना गावात बोलून सय्यद कुटुंबावर लाथा काट्यासह हल्ला केल्याने दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. (Crime News)

Jalna Latest Crime News
Cm Eknath Shinde on Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाले...

या हाणामारीत दोन्ही गटातील 18 ते 19 जण गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी बदनापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटाकडून लाट्या काट्यासह विटा, कोयता अशी हत्यारे जप्त करत दोन्ही गटाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com