Shaktipeeth Highway
Shaktipeeth HighwaySaam

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाला विरोध, शेतकऱ्यांनी ताकद दाखवली, मंत्री चंद्रकांत पाटलांना घेरलं

Nagpur Goa Expressway: शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या आंदोलक शेतकरी आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात चांगलीच खडाजंगी झाली. संतप्त शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.
Published on

विजय पाटील, साम टीव्ही

Clash Between Minister Chandrakant Patil and Protesters: सांगलीत शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या आंदोलक शेतकरी आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात चांगलीच खडाजंगी झाली. संतप्त शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना घेरण्याचाही प्रयत्न केला. यावेळी शेतकरी आक्रमक होताच चंद्रकांत पाटील पोलिसांवर संतापले. तसेच पाटलांनी पोलिसांनाच झापलं.

Shaktipeeth Highway
Shaktipeeth HighwaySaam

शक्तिपीठ महामार्ग कायमचा रद्द करावा, या मागणीसाठी महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री व उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले असता, शेतकरी त्यांना निवेदन देण्यासाठी गेले. निवेदन देण्याच्या वेळी चंद्रकांत पाटील आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला.

Shaktipeeth Highway
Kalyan: कल्याणमध्ये ड्रग्जचा सुळसुळाट, इराणी लेडी डॉनकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त; परिसरात खळबळ

चंद्रकांत पाटील म्हणाले, “मी देखील चळवळीतून पुढे आलो आहे, माझ्यासोबत मोठ्या आवाजात बोलायचे नाही.” त्यांनी या महामार्गाला केवळ पाच शेतकऱ्यांचा विरोध असल्याचेही सांगितले. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आणि पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर पाटील यांनीच पोलिसांवर राग व्यक्त केला आणि पोलिस निरीक्षकांना झापले.

Shaktipeeth Highway
SSC- HSC Result: दहावी-बारावीच्या निकालाची तारीख ठरली! बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती

यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

Shaktipeeth Highway
Shaktipeeth HighwaySaam

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com