Maharashtra News Live Update: जंतर-मंतरवर सीजीपीचं आंदोलन, दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Marathi Breaking Live Headlines Updates : सीजीपीचे आज दिल्लीत आंदोलन, अभिजित दीपके, ध्रुव राठी, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी, महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती, महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News

Maharashtra News Live Update: जंतर-मंतरवर सीजीपीचं आंदोलन, दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

दिल्लीत हाय-वोल्टेज ड्रामा! CJP च्या आंदोलनापूर्वी ड्रोनची नजर; राजधानीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज CJP च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि विविध मुद्द्यांवर होणार्या या आंदोलनाला रोखण्यासाठी प्रशासनाने अक्षरशः छावणीचे स्वरूप धारण केले आहे.

जनपथ आणि हॉटेल ली मेरिडियन परिसरासभोवतालच्या गोलचक्रावर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आणि प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी आता थेट ड्रोनचा वापर केला जात आहे. आंदोलनाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून दिल्ली पोलिसांनी आकाशातून ड्रोनच्या माध्यमातून कडक टेहळणी सुरू केली आहे.

दिल्लीत तणाव! CJPच्या आंदोलनापूर्वी राजधानीत कडक सुरक्षा; जनपथ आणि संसद मार्ग परिसरात पोलिसांचा पहारा

आज 'CJP' (Citizens for Justice and Peace) च्या नियोजित विरोध प्रदर्शन आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे.

सध्या जनपथ, ली मेरिडियन हॉटेल परिसर आणि संसद मार्ग पोलीस स्टेशन क्षेत्रातील दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात असल्याचे दिसून येत आहे. आंदोलनाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणतीही अनपेक्षित परिस्थिती टाळता यावी, यासाठी दिल्ली पोलिसांकडून संवेदनशील भागांमध्ये कडेकोट सुरक्षा चक्र तयार करण्यात आले आहे.

अजित पवार गटाकडून पैसे वाटप केल्याचा आरोप

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडून पैसे वाटप केल्याचा आरोप केला जातोय. माळेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष यांच्या गाडीत वीस लाख रुपये सापडल्याचा आरोप पुरुषोत्तम जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी केलाय. मध्यरात्री सभासदांना पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप आहे. या संदर्भात सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून उद्या 21 जागांसाठी मतदान पार पाडणार आहे. त्याआधी पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप केला जातोय.

रत्नागिरी शहरात आता दर सोमवारी पाणी कपात...

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि तीव्र उष्णतेमुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन विचारात घेता, रत्नागिरी शहरातील पाणीसाठा आगामी एप्रिल-मे महिन्यांपर्यंत पुरवण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषदेने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. शासनाच्या १० टक्के पाणीकपातीच्या निर्देशानुसार शहरात दर सोमवारी संपूर्ण पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. तसेच दैनंदिन पाणीपुरवठ्याच्या वेळेत १५ मिनिटांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात येत असालीची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

अभिजीत दिपके दिल्लीकडे रवाना

दिल्ली येथील जंतर मंतरवर होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनासाठी संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके हे आज दिल्लीला जाणार आहेत. सकाळी आठ वाजता एअर इंडियाच्या विमानाने ते दिल्लीसाठी रवाना होतील. काही वेळापूर्वीच अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ऑन द वे टू एअरपोर्ट अस मेसेज टाकून आपण दिल्लीला जाण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.मात्र इतर नेत्यांप्रमाणे पोलिस अभिजित दीपके यांना मुंबईतच डिटेन करणार का हे पाहावं लागेल.

नवरात्रोत्सवानिमित्त पुणे शहरातील वाहतूक बदल

श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, श्री चतु:शृंगी मंदिर, भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर, सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसर या भागातील रस्ते वाहतुकीस बंद

यामध्‍ये उद्यापासून अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकापर्यंतचा (हुतात्मा चौक) रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार

बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक दरम्यान एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे

जंतर-मंतरवर सीजीपीचं आंदोलन, दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद

दिल्लीतील जंतर-मंतरवर सीजीपीचं आंदोलन होत आहे. याच पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय.. मेट्रो सेवा बंद असल्याने मेट्रो सेवा बंद असल्याने आंदोलन जंतर-मंतरवर कसे पोहोचतात हे पहावं लागणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com