Abhijeet Dipke Announcement: अभिजीत दीपके राजकारणात येणार? निवडणुकीसंदर्भात केली मोठी घोषणा

Abhijeet Dipke Announcement: CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिलेत. NEET विरोधी आंदोलनानंतर २०२९ च्या निवडणुकांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Abhijeet Dipke Announcement:
CJP founder Abhijeet Dipke latest statementsaam tv
Published On
Summary
  • सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी २०२९ पर्यंत राजकीय भूमिका घेण्याचे संकेत दिले.

  • राजकारणापासून दूर राहणे शक्य नसल्याचे दीपके यांनी स्पष्ट केले.

  • NEET आंदोलनानंतर CJP च्या भविष्यातील वाटचालीबाबत मोठे विधान

नीट घोटाळ्यामुळे सुरू झालेले कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. CJPचे संस्थापक दीपके आपल्या छत्रपती संभाजीगरातील घरी पोहोचलेत. त्यांची प्रकृती सध्या बिघडलेली असून ते उपचार घेत आहेत. मात्र त्याआधी त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना निवडणुकीबाबत आणि राजकीय भूमिका घेण्याबाबत मोठं विधान केलंय. विष्यात कॉकरोच जनता पार्टीची वाटचाल कशी असेल? कॉकरोच कोणत्या मुद्द्यावर लढा देणार या प्रश्नावर बोलताना त्यांनी मोठं विधान केलंय.

Abhijeet Dipke Announcement:
भाजप सोडताच बड्या नेत्यानं मागितला थेट पंतप्रधान मोदींचा राजीनामा; काय आहे प्रकरण?

एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना दीपके म्हणाले की, आम्हाला राजकीय स्टँड घ्यावाच लागेल. त्याशिवाय आपण राहू शकत नाही. आपली पुढील मांडताना दीपके यांनी वाहन आणि पेट्रोलचं उदाहरण दिलं. आपण गाडीत पेट्रोल टाकतो त्या पेट्रोलच्या किमती राजकारणी ठरवतात. टुथब्रशच्या किमतीही सरकारच ठरवतं. मी क्लिअरली सांगतो. आम्ही धर्मेंद्र प्रधानांच्या वेळी राजकीय स्टँड घेतला. आम्ही २०२९ पर्यंत पॉलिटिकल स्टँड घेण्याचा ऑप्शन घेतलाय, असे दीपके यांनी सांगितले.

Abhijeet Dipke Announcement:
शिंदे गटात अंतर्गत वाद! एकनाथ शिंदे मंत्री संजय शिरसाट आणि बच्चू कडूंवर नाराज; धक्कादायक कारण आलं समोर

आमचा पॉलिटिकल स्टँड हा सरकारच्या बाजूने नसेल आणि विरोधकांच्या विरोधात नसेल. तर लोकशाही बळकट करण्यावर असेल. मला झेन-जीला सांगायची गरज नाही. कुणाला मतदान करावं किंवा करू नये हे तेच ठरवतील. झेन-जीला काही कळत नाही असं समजू नये. ते स्मार्ट आहेत. निवडणूक आल्यावर आम्ही राजकीय स्टँड घेऊ. सरकारने चुकीचं काही केलं तर आम्ही त्यांच्याविरोधात बोलू. पण मतदान कुणाला करावं हे आम्ही सांगणार नाही, असंही दीपके यांनी स्पष्ट केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com