सरकारी स्कूल ठीक करो, दिपकेंचं सरकारला नवं आव्हान

Abhijit Dipke Challenges Government Over Poor Condition: स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत दिपकेंनी स्कूल ठीक करो अभियानाची सुरूवात केलीये... अभियानाच्या माध्यमातून सीजेपीनं देशातील सरकारी शाळा सुधारण्यावर भर दिलाय. मात्र, या अभियानाची सुरूवात कुठून झालीये? पाहूयात यावरचा एक रिपोर्ट...
CJP SCHOOL THIK KARO CAMPAIGN: ABHIJIT DIPKE CHALLENGES GOVERNMENT
CJP SCHOOL THIK KARO CAMPAIGN: ABHIJIT DIPKE CHALLENGES GOVERNMENTsaam tv
Published On

80व्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत कॉक्रोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीनं 'स्कूल ठीक करो' अभियानाला सुरूवात केलीये. सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंनी या अभियानाची सुरूवात स्वतःच्या संतुक पिंपरी गावातील जिल्हा परिषद शाळेतून केलीये. यावेळी सरकारी शाळेच्या दुरावस्थेवरून दिपकेंनी नाव न घेता पंतप्रधान मोदींना खोचक टोला लगावलाय... तर दुसरीकडे, ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेवरून दिपकेंनी सरकारवर गंभीर आरोपही केलेत.

दुसरीकडे या अभियानचं स्वागत करतानाच राज्यमंत्री पंकज भोयर यांनी हे अभियान केवळ टीकेपुरतं मर्यादीत राहू नये असं म्हटलंय. सीजेपीचा मोर्चा आता सरकारी शाळांकडे वळलाय. या मोहिमेअतर्गत अभिजीत दिपकेंसह सौरव दास, आशुतोष रांका यांच्यासह सीजेपीचे सर्व सदस्य देशभरातील ग्रामीण भागात दौरा करून शाळा दुरुस्तीची मागणी करणार आहेत. त्यामुळे या मुद्दयावरून दिपके सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरणार, एव्हंढ निश्चित... मात्र, खरोखरच या अभियानातून ग्रामीण महाराष्ट्रासह देशभरातील सरकारी शाळांची बिकट अवस्था बदलण्यात सीजेपी कितपत यशस्वी होणार?, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com