Zero Shadow Day: चंद्रपुरात नागरिकांनी अनुभवला शून्य सावली दिवस, हे नेमकं काय असतं? जाणून घ्या

Chandrapur Zero Shadow Day: चंद्रपुरकरांनी आज 'शून्य सावली दिवस' अर्थात Zero Shadow Day या खगोलीय घटनेचा अनुभव घेतला. विषुववृत्त आणि कर्क वृत्त यांच्यामध्ये १९ अंश आणि ५८ मिनिटांवर चंद्रपूर शहराची भौगोलिक स्थिती आहे.
चंद्रपुरात नागरिकांनी अनुभवला शून्य सावली दिवस, हे नेमकं काय असतं? जाणून घ्या
Chandrapur Zero Shadow DaySaam Tv
Published On

चंद्रपुरकरांनी आज 'शून्य सावली दिवस' अर्थात Zero Shadow Day या खगोलीय घटनेचा अनुभव घेतला. विषुववृत्त आणि कर्क वृत्त यांच्यामध्ये १९ अंश आणि ५८ मिनिटांवर चंद्रपूर शहराची भौगोलिक स्थिती आहे आणि त्यामुळे 20 मे ला सूर्य अगदी चंद्रपूर शहराच्या डोक्यावर असतो.

त्यामुळे या दिवशी कुठल्याही गोष्टीची सावली ही अगदी सरळ पायात पडते आणि त्यामुळे सावली नसल्याचा आभास होतो. या खगोलीय घटनेचा अनुभव घेण्यासाठी भूगोल अभ्यासक, नागरिक, विद्यार्थी एकत्र आले. या खगोलीय घटनेचा नागरिकांनी उत्साही अनुभव घेतला.

चंद्रपुरात नागरिकांनी अनुभवला शून्य सावली दिवस, हे नेमकं काय असतं? जाणून घ्या
Lok Sabha Election: काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा पराभव निश्चित, विरोधी आघाडीत फूट पडण्यास सुरुवात: PM मोदी

शून्य सावलीचा दिवस म्हणजे काय आहे?

शून्य सावलीचा दिवस म्हणजे काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर हा असा दिवस आहे जेव्हा दिवसाच्या एका विशिष्ट वेळी सूर्य थेट आपल्या डोक्यावर येतो ज्यामुळे सावली तयार होत नाही, म्हणून या स्थितीला शून्य सावली म्हणतात.

चंद्रपुरात नागरिकांनी अनुभवला शून्य सावली दिवस, हे नेमकं काय असतं? जाणून घ्या
Iran News: इराण राष्ट्राध्यक्षांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, अपघात की इस्त्रायलकडून घातपात?

ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया (ASI) नुसार, +23.5 आणि -23.5 अंश अक्षांश दरम्यानच्या सर्व ठिकाणी शून्य सावलीचा दिवस वर्षातून दोनदा येतो. या वेळी दुपारच्या वेळी, सूर्य जवळजवळ ओव्हरहेड असतो. मात्र उंचीवर थोडासा कमी, किंचित उत्तरेकडे किंवा किंचित दक्षिणेकडे जातो, परिणामी पृथ्वीवर शून्य सावली असते. यामुळेच Zero Shadow Day दरम्यान सावल्या गायब होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com