Lok Sabha Election: काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा पराभव निश्चित, विरोधी आघाडीत फूट पडण्यास सुरुवात: PM मोदी

PM Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पश्चिम बंगालमधील झारग्राम येथे निवडणूक सभेला संबोधित केले. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यानंतर काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा पराभव निश्चित असून यानंतर विरोधी आघाडीतील फूट सुरू होईल, असा दावा त्यांनी केला.
काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा पराभव निश्चित, विरोधी आघाडीत फूट पडण्यास सुरुवात: PM मोदी
PM ModiSAAM TV
Published On

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पश्चिम बंगालमधील झारग्राम येथे निवडणूक सभेला संबोधित केले. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यानंतर काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा पराभव निश्चित असून यानंतर विरोधी आघाडीतील फूट सुरू होईल, असा दावा त्यांनी केला.

मोदींनी काँग्रेस नेत्यांवर जातीयवाद पसरवल्याचा आरोप केला. त्यांना अनुसूचित जाती-जमातींचे आरक्षण हिसकावून मुस्लिमांना द्यायचे आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, ''पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर तृणमूल काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा पराभव झाला आहे. 4 जूननंतर विरोधी आघाडीचे अस्तित्व संपुष्टात येईल.''

काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा पराभव निश्चित, विरोधी आघाडीत फूट पडण्यास सुरुवात: PM मोदी
Iran News: इराण राष्ट्राध्यक्षांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, अपघात की इस्त्रायलकडून घातपात?

काँग्रेस हा जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप मोदींनी केला. ते म्हणाले, 'काँग्रेसला एससी, एसटी आणि ओबीसींचे हक्क हिरावून मुस्लिमांना आरक्षणाचा लाभ द्यायचा आहे. काँग्रेसचे नेते 100 टक्के जातीयवादी आहेत. हे काँग्रेसचे सत्य आहे, जे या पक्षाने आणि त्यांच्या परिसंस्थेने वर्षानुवर्षे देशवासीयांना उघड होऊ दिले नाही.

सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, 'एकीकडे मनमोहन सिंह म्हणाले होते की, भारताच्या संसाधनांवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे. दुसरीकडे, सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे युवराज (राहुल गांधी) काँग्रेस मुस्लिमांना आरक्षण देणार असल्याचे सांगत आहेत.

काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा पराभव निश्चित, विरोधी आघाडीत फूट पडण्यास सुरुवात: PM मोदी
Jayant Patil Letter: लढाई अद्याप संपलेली नाही, ५ व्या टप्प्यातील मतदान संपताच जयंत पाटील यांचं कार्यकर्त्यांना भाविनक पत्र

मोदी म्हणाले की, मी काँग्रेसच्या युवराजांचा 11-12 वर्षे जुना व्हिडिओ पाहिला आहे. ते म्हणाले, 'मी सोशल मीडियावर काँग्रेसच्या युवराजांचा व्हिडिओ पाहिला. या 11-12 वर्षांच्या व्हिडीओमध्ये काँग्रेसचे राजकुमार युवराज सांगत आहेत की, काँग्रेस मुस्लिमांना आरक्षण देईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com