Nylon Manja, Nashik, Makar Sankranti
Nylon Manja, Nashik, Makar Sankrantisaam tv

Makar Sankranti 2023 : पतंगोत्सवाला गालबाेट, नायलॉन मांजाने कापला गळा; जखमी रुग्णालयात दाखल

या घटनेमुळे अजूनही बाजारात नायलाॅलन मांजा मिळत असल्याचे उघडकीस झाले.

- अजय सोनवणे

Nylon Manja : नायलॉन मांजामुळे पहिल्या दिवशी मकर संक्रातीच्या उत्साहाला गालबोट लागल्याची घटना आज समाेर आली. बाबुळगाव रोडवर एका नागरिकाचा गळा व हात कापल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

Nylon Manja, Nashik, Makar Sankranti
Mahableshwar Accident News: महाबळेश्वरच्या दरीत अपघातग्रस्तांच्या किंचाळ्या, आक्राेश सुरु; बुलढाणा, अकाेल्यातील मजूर

मकर संक्रात निमित्त राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पतंग उडविण्याचा दांडगा उत्साह असताे. या सणा नमित्त नाशिक (nashik) जिल्ह्यातील येवला शहरात आजपासून (शनिवार) तीन दिवस पतंगाेत्सव साजरा हाेत आहे. त्यामुळे शहरात बहुतांश ठिकाणी आकाशात पतंग लहरताना दिसत आहेत.

Nylon Manja, Nashik, Makar Sankranti
Nashik-Shirdi Highway Accident: नाशिक-शिर्डी बस अपघातातील मृतांच्या वारसांना, जखमींना पंतप्रधान माेदींकडून मदत जाहीर

बाबुळगाव रोडवर पतंग उडविला जात हाेता. काहींनी त्यासाठी नायलॉनच्या मांजाचा (nylon manja) वापर केला हाेता. नायलॉन मांजामुळे एका नागरिकाचा गळा आणि हात कापल्याची घटना घडली. त्यानंतर तातडीने संबंधितास रुग्णालयात पाठविण्यात आले. जखमी नागरिकावर रुग्णालयात (hospital) उपचार सुरु आहेत.

Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com