Nashik Road Accident Latest Updates : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शिर्डी महामार्गावर आज (शुक्रवार) झालेल्या आराम बस आणि ट्रक अपघातात (Nashik Truck Bus Accident News) दहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेतील मृतांच्या वारसांना महाराष्ट्र सरकराने आर्थिक मदत जाहीर केली आहे. याबराेबरच पंतप्रधान नरेंद्र माेदी (PM Modi) यांनीही शाेक व्यक्त करीत अपघातग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची ग्वाही दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक-शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) अपघातग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.
नाशिक-शिर्डी महामार्गावर (nashik shirdi highway) झालेल्या अपघातात जीवितहानी झाल्याने दुःख झाल्याचे ट्विट पंतप्रधान कार्यालयाने केले आहे. मृतांच्या वारसांना दाेन लाख रुपये तसेच जखमींना पन्नास हजार रुपये उपचारासाठी देण्याची ग्वाही ट्विटमधून देण्यात आली आहे.
दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस, क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी या अपघातात (accident) मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहत जखमी झालेले लवकर बरे व्हावेेत अशी प्रार्थना केली आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.