Accident News: ट्रकची दुचाकीस धडक; बाळ ठार, आई गंभीर जखमी

पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.
Accident
Accident Saam tv
Published On

बुलडाणा : खामगाव (khamgoan) शहरानजीकच्या घाटपुरी देवी जवळ ट्रकने ठाेकर (khamgoan accident news) दिल्याने दुचाकीवरील आठ महिन्याचे बाळ (child) जागीच ठार झाले तर त्याची आई (mother) गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातामुळे (accident) दुचाकीस्वार आंनद चांडक यांना धक्का बसला आहे. (buldhana latest marathi news)

जळगाव (jalgoan) जामोद तालुक्यातील खणदावी येथील आंनद चांडक हे आपली पत्नी दुर्गा आणि आठ वर्षीय हंस यांच्या सोबत खामगाव येथील रुग्णालयात दाखल असलेल्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी आले होते. सायंकाळी ते घरी परतात असताना शहरानजीकच्या घाटपुरी देवी जवळ त्यांचा अपघात झाला.

Accident
...अन्यथा 'स्वाभिमानी' राज्यातील महावितरणची कार्यालये फाेडेल : रविकांत तुपकर

प्राथमिक माहितीनूसार चांडक यांनी घटनास्थळावरील असलेल्या स्पीड ब्रेकर इथं वाहनाचा वेग केला तेव्हा पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात चांडक यांच्या आठ महिन्याचे बाळ जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी दुर्गा या गंभीर जखमी झाल्या. या अपघातानंतर नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले. दरम्यान दुर्गा यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अकोला (akola) येथे हलविण्यात आले आहे. पोलिसांनी (police) ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Accident
World Cup: टीम इंडिया 'अजिंक्य'; फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड पुढं पाक गारद
Accident
शर्मा कुटुंबियांना धक्का; मुलास वाचविण्यासाठी गेलेल्या वडिलांचाही बुडून मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com