Chhattisgarh Accident News: महाराष्ट्र छत्तीसगडच्या सीमेलगत भीषण अपघात; एक चालक ठार तर दुसरा जखमी

या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.
Chhattisgarh Accident News
Chhattisgarh Accident NewsSaam TV
Published On: 

Chhattisgarh Accident News: छत्तीसगड येथून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. दोन ट्रक भरधाव वेगाने आल्याने दोघांचा भीषण अपघात झालाय. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. जखमी व्यक्तीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, महाराष्ट्र छत्तीसगडच्या सीमेलगत देवरी बॉर्डर नजिक आयषर ट्रक क्र CG 04 NW 4540 या ट्रकची रस्त्यावर उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रक क्र MH 18 BG 9407 ला जोरदार धडक लागून भीषण अपघात झाला आहे .

Chhattisgarh Accident News
Maharashtra Politics: अजितदादांच्या शपथविधीनंतर शिंदे गटात धुसफूस वाढली; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात हिवरखेड नजिकच्या खंडाळा येथील चालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर हिवरखेड येथील पर्यायी चालक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतक चालकाचे नाव पुरुषोत्तम कळंबे तर दुसऱ्या जखमी पर्यायी चालकाचे नाव पुरुषोत्तम काळे आहे.

ही धडक इतकी भीषण होती की आयशर ट्रकचे समोरील दोन्ही टायर फुटले आहेत,आणि आयशर ट्रकच्या केबिनचा संपूर्ण चुराडा झाला. दोन्ही चालक हे हिवरखेड परिसरातील होते. यामध्ये खंडाळा येथील पुरुषोत्तम कळंबे या चालकाचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Chhattisgarh Accident News
Pune Crime News: पुण्यात कोयत्याची दहशत! कोयता विकण्यावरुन झाला वाद, पती-पत्नीने एकमेकांवर केले वार

धुळ्यामध्ये भरधाव कंटेनर हॉटेलमध्ये घुसला

आज धुळ्यात देखील अपघाताची एक भीषण घटना घडली आहे. या घटनेत मुंबई- आग्रा महामार्गावर भरधाव कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसला. शिरपूर येथील पळासणेर येथील मध्यप्रदेश बॉर्डरवर ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० ते २५ जण जखमी झाले आहेत. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.