

लातूर - आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj)यांची जयंती (Shiv Jayanti) साजरी करताना लातुरात अदभुत आणि विश्वविक्रम निर्माण करण्यात 11 हजार चौरस फूट आकाराचे तैलचित्र तब्बल दोन महिने अथक परिश्रम घेतले आहे. त्यात 16 दिवस आणि रात्र काम करून तैलचित्र साकारण्यात आले असून त्याचे अनावरण करण्यात आले आहे. लातूरचे प्रसिद्ध चित्रकार मंगेश निपणीकर आणि टीमने अथक परिश्रमातून विश्वविक्रम निर्माण करणारे तैलचित्र साकारले आहे. आजपासून तीन दिवस नागरिकांना पाहण्यासाठी खुल असणार आहे. (Latur Shiv Jayanti News)
हे दखल पहा -
अक्का फाऊंडेशनच्या पुढाकारातून निलंगा येथे साकारण्यात आलेल्या विश्वविक्रमी ११ हजार चौरस फुटाच्या छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेच्या तैलचित्राचे लोकार्पण माजी खासदार श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला संपन्न झाले.
यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने विक्रमी मोटार सायकल रॅली, हरित छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती साकारल्याचा विक्रम असून आता 11 हजार चौरस फुटाचे तैलचित्र साकारले आहे नक्कीच याची नोंद होईल यात शंका नाही.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.