Chhatrapati Sambhajinagar News: सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेचा २ मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न, रडण्याचा आवाज ऐकून लोक धावले, मोठा अनर्थ टळला!

Chhatrapati Sambhajinagar News: मात्र रडण्याचा आवाज ऐकू आल्याने काही समाजसेवक त्याठिकाणी धावून आले आणि त्यांनी महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखले.
Chhatrapati Sambhajinagar News: सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेचा २ मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न, रडण्याचा आवाज ऐकून लोक धावले, मोठा अनर्थ टळला!
Chhatrapati Sambhajinagar News:Saamtv
Published On

रामनाथ ढाकणे| छत्रपती संभाजीनगर, ता. २१ ऑगस्ट २०२४

पोलीस अधिकारी असलेल्या दिरासह सासरच्या त्रासाला कंटाळून एका महिलने २ मुलांसह रेल्वे रुळावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली. यावेळी मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकून लोक धावले अन् मोठा अनर्थ टळला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Chhatrapati Sambhajinagar News: सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेचा २ मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न, रडण्याचा आवाज ऐकून लोक धावले, मोठा अनर्थ टळला!
Badlapur Case : बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेनंतर ठाकरे गट आक्रमक; देवेंद्र फडणवीसांना विचारले 5 महत्वाचे प्रश्न

दोन मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर शहरातील संग्रामनगर रेल्वे रुळावर आपल्या 2 मुलांना घेऊन एका महिलेने रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डी.वाय.एस.पी असलेल्या दिरासह सासरच्या मंडळी कडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून ही महिला रेल्वे रुळावर आपल्या 2 लहान मुलांना घेऊन गेली.

लोक धावल्याने मोठा अनर्थ टळला!

मात्र रडण्याचा आवाज ऐकू आल्याने काही समाजसेवक त्याठिकाणी धावून आले आणि त्यांनी महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखले. यावेळी नागरिकांनी महिलेचे समुपदेशन करुन तिला पोलिसांच्या स्वाधीन केले त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Chhatrapati Sambhajinagar News: सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेचा २ मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न, रडण्याचा आवाज ऐकून लोक धावले, मोठा अनर्थ टळला!
Maharashtra Politics : हसन मुश्रीफ यांना दणका देण्यासाठी शरद पवारांचा मास्टर प्लान; कोल्हापुरात राष्ट्रवादीची मोठी खेळी

दरम्यान, ही महिला याच कुटुंबातील एका व्यक्तीसोबत 2020 पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. डिव्होर्स झाल्याचे त्याने तिला खोटे सांगितले आणि वारंवार तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास देत होता. याच त्रासातून तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar News: सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेचा २ मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न, रडण्याचा आवाज ऐकून लोक धावले, मोठा अनर्थ टळला!
Pune News: ब्रेकिंग! मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक; १६ तासांच्या चौकशीनंतर मोठी कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com