Chhatrapati Sambhajinagar: कर्ज न दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या, प्रहार संघटना आक्रमक; इंडियन बँकेच्या कार्यालयावर फेकले शेण

Maharashtra Breaking News: बँकेने कर्ज न दिल्याने शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली होती. या बँकेविरोधात आज प्रहार संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
Chhatrapati Sambhajinagar: कर्ज न दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या, प्रहार संघटना आक्रमक;  इंडियन बँकेच्या कार्यालयावर फेकले शेण
Maharashtra Breaking News: Saamtv

छत्रपती संभाजीनगर, ता. १ जून २०२४

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पिंपळखुटा गावातील एका शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर प्रहार संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पीक कर्जासाठी शेतकऱ्याकडून लाच मागितल्यामुळे पिंपळखुटा येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावरून संताप व्यक्त करत इंडियन बँकेवर शेण फेकले. यावेळी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पिंपळखुटा गावातील शेतकरी विठ्ठल दाभाडे यांनी काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली. बँकेने कर्ज मंजूर करून चार महिने झाले तरी खात्यात पैसे आले नव्हते. या कर्जासाठी बँक मॅनेजर तसेच एजेंटने लाच मागितली होती. मात्र पैसे न दिल्याने कर्ज मिळाले नाही, याच नैराश्येतून आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला होता.

याप्रकरणी प्रहार संघटनेने इंडियन बँकेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज इंडियन बँकेच्या शेंद्रा येथील कार्यालयावर शेण फेकले. तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाईची मागणीही ही केली.

Chhatrapati Sambhajinagar: कर्ज न दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या, प्रहार संघटना आक्रमक;  इंडियन बँकेच्या कार्यालयावर फेकले शेण
Rahul Gandhi : PM नरेंद्र मोदी मौनव्रतात, आता चर्चा अशक्य; ४५ तासांच्या ध्यानधारणेवरून राहुल गांधींनी काढला चिमटा

दरम्यान, यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच १५ दिवसाच्या आतमध्ये जर विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मदत मिळाली नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या घरावरही शेण फेकू, याची या सरकारने नोंद घ्यावी, असा इशाराही यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.

Chhatrapati Sambhajinagar: कर्ज न दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या, प्रहार संघटना आक्रमक;  इंडियन बँकेच्या कार्यालयावर फेकले शेण
Pune Porsche Case : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, डॉक्टरांनी बदललेले 'ते' रक्ताचे नमुने कुणाचे? मोठी माहिती उघड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com