खेळताना डबक्याजवळ गेले, पाण्यात बुडून सख्ख्या चिमुकल्या भाऊ बहिणीचा मृत्यू; आई-बापाचा आक्रोश

Chhatrapati Sambhajinagar Brother and Sister Drowned : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडलेली आहे. साचलेल्या पाण्यात बुडून दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. जिल्ह्यातील मोढा बुद्रूक शिवारात ही घटना घडली आहे.
Chhatrapati Sambhajinagar Brother and Sister Drowned
Chhatrapati Sambhajinagar Brother and Sister DrownedSaam Tv News
Published On

माधव सावरगावे, साम टिव्ही

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडलेली आहे. साचलेल्या पाण्यात बुडून दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. जिल्ह्यातील मोढा बुद्रूक शिवारात ही घटना घडली आहे. साचलेल्या पाण्यात बुडून सख्या बहीण आणि भावाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास मोढा बुद्रूक शिवारात घडली.

मोढा बुद्रूक शिवारातील गट क्रमांक १७२ मधील शेतात ऊसतोड कामगार गणेश कांबळे राहतात. दोन दिवसांपासून पावसाचा जोर असल्यामुळे शेतशिवारात पाणी साचलेलं आहे. दुपारी गणेश कांबळे यांची मुलगी हर्षदा गणेश कांबळे (वय ६ वर्ष) आणि मुलगा रुद्र गणेश कांबळे (वय अडीच वर्ष) दोघे घराजवळील साचलेल्या डबक्याच्या पाण्याजवळ गेले. दोघांचा या पाण्यात बुडून मृत्यू झाला. गणेश कांबळे मजुरी करून पोट भरतात. दोन्ही लेकरांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या परिवारावर मोठा आघात झाला. चिमुरड्यांचा मृतदेह शहरातील घाटी रुग्णालयात आणण्यात आला होता.

Chhatrapati Sambhajinagar Brother and Sister Drowned
School Holidays 2025: वर्षभरात १२८ दिवस शाळेला असणार सुट्टी; जाणून घ्या कधी, केव्हा अन् किती दिवस असतील सुट्ट्या

इमारतीवरुन पडून तरुणीचा मृत्यू

दरम्यान, रायगड जिल्ह्यातील महाड शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चार मजली इमारतीच्या टेरेसवरून पडून २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. महाड शहरातील काकर तळे येथे हे घडली आहे. रिया किशोर चौधरी असं या तरुणीचं नाव आहे. ती राहत असलेल्या समर्थ रामदास सहकारी गृहनिर्माण सोसायटी या चार मजली इमारतीच्या टेरेस वरून ती खाली पडली. गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेत तीला महाडच्या ग्रामीण रुग्णालयात नेलं मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. ती इमारतीवरु पडली कशी याबद्दल कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाहीय.

Chhatrapati Sambhajinagar Brother and Sister Drowned
Two Wheeler Toll : आता बाईकलाही टोल लागणार? १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com