नर्सेस बनल्या चिमुकल्यांसाठी 'देवदूत', रुग्णालयातील भीषण आगीतून 9 बालकं बचावली

Major Tragedy Averted In Chhatrapati Sambhajinagar: राज्यात पुन्हा अमरावतीसारखी दुर्घटना सुदैवानं टळलीये. छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉस्पिटलमध्ये NICU विभागात आग लागली. या आगीतून नवजात बालकांना मोठ्या शर्थीच्या प्रयत्नातून वाचवण्यात आलंय. रुग्णालयांतील आगीच्या घटनांमुळे बालकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय...
9 Newborn Babies Rescued From NICU Fire In Chhatrapati Sambhajinagar Hospital
9 Newborn Babies Rescued From NICU Fire In Chhatrapati Sambhajinagar Hospitalsaam tv
Published On

राज्यातील रुग्णालयांमधील आगीच्या घटनांमध्ये वाढ होत चाललीये. अमरावतीमधील शासकीय रुग्णालयातील आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेची भळभळती जखम शांत होत असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा अनर्थ टळलाय. एशियन हॉस्पिटलच्या लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात म्हणजेच NICUमध्ये आग लागल्यानं एकच खळबळ उडाली. यावेळी NICU मधील 9 चिमुकल्यांसह सर्व 58 रुग्णांना नर्सेसनी सुखरुप बाहेर काढून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवलंय. या सर्व थरार घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलाय... घटनेनंतर कर्मचाऱ्यांची कशी धावपळ झालीये ते पाहा...

मात्र हा अनर्थ टळला तो हॉस्पिटलमधील नर्सेसमुळे. या नर्सेस देवदूत बनून मदतीसाठी धावून आल्यात. हॉस्पिटलमधील आगीच्या घटनेचा अंगावर शहारे आणणारा अनुभव नर्सनं सांगितलाय...

दरम्यान, अग्निशमन दलानं तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्यानं सुदैवानं मोठी दुर्घटना टळलीये. मात्र, एसीतील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती हॉस्पिटलच्या संचालकांनी दिलीये... खरंतर, अग्निशमन दलाची तत्परता आणि पोलीस, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची धावपळ या सर्वांमुळे अनेक बालकांसह रुग्णांचेही प्राण वाचलेत. मात्र, यानिमित्तानं हॉस्पिटलमधील सुरक्षा यंत्रणांचा प्रश्न उपस्थित झालाय... एव्हंढच नाही तर हॉस्पिटलमधील सुरक्षा यंत्रणेच्या ऑडिटचा मुद्दाही अधोरेखित झालाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com